Maharashtra BJP core committee meeting Sarkarnama
महाराष्ट्र

BJP core committee meeting : भाजप 160, शिवसेना 80, राष्ट्रवादी 48? भाजप कोअर कमिटीत जागावाटपावर शिक्कामोर्तब?

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीला किती जागा लढायच्या याचा आकडा भाजपने जवळपास निश्चित केला आहे. भाजप 160 जागा लढण्याच्या तयारीत आहे. भाजपचा हा आकडा खूप मोठा असल्याने त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.

मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या या आकड्याची धास्ती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जबरदस्त राहिला आहे. त्यामुळे भाजपच्या या आकड्यावर शिवसेनेची पहिली हरकत राहणार आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित झाली. या बैठकीत भाजपने राज्यात विधानसभेच्या 160 जागा लढायच्या यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. या आकड्यावर देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांची चर्चा करणार आहेत. भाजपने यापूर्वी जिंकलेल्या जागांची यादी तयार करत या जागा लढण्यासाठी निश्चित केल्या आहेत. भाजप राज्यात लढवणार असलेल्या जागांचा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय निरीक्षक भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

भाजपमधील (BJP) या प्रमुख नेत्यांनी या जागा निश्चित करताना काही निकष समोर ठेवले होते. यात भाजपची संघटनात्मक ताकद, आमदारांनी पडलेली मते, पक्षाच्या उमेदवाराला पडलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मते, संघटनात्मक ताकद, लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी, शहरी भाग, निमशहरी भाग, लोकसभेत विधानसभा मतदारसंघनिहाय स्ट्राईक रेट, मित्रपक्षांची ताकद, मराठा, ओबीसी आरक्षणाचा वादाचा फटका या सर्व बाबींचा यात अभ्यास केला गेला आहे.

भाजपच्या या आकड्याची धास्ती मित्रपक्षांनी घेतली आहे. वरकरणी महायुतीत भाजपने 160 जागा लढण्याचे निश्चित केले असले, तरी यानुसार शिवसेनेला 80 आणि उर्वरीत 48 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, असे जागावाटपाचे गणित होते. हेच शिवसेनेच्या बाजूने विचार केल्यास शिवसेना 100, भाजप 140 आणि उर्वरीत राष्ट्रवादी काँग्रेस जागा राहतील. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला विधानसभेसाठी राज्यात 126 जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांचा आकडा अजून जाहीर केलेला नाही. जनसन्मान रॅलीनंतर ते आकडा जाहीर करणार आहेत. त्यामुळे भाजपचा हा आकडा मित्रपक्षांना कितपत भावेल, हे लवकर समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT