Beed News : मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. यामध्ये यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला, असा आरोप केला. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासह माझी सीबीआय, नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग करा, अशी मोठी मागणी धनंजय मुंडें यांनी केली. त्यासोबतच सीएम देवेंद्र फडणवीसांना वाईट वाटेल, मात्र बीडमधील यंत्रणा जरांगे यांना घाबरते, असा गंभीर आरोप करीत धनंजय मुंडेंनी पोलीस यंत्रणेसह जरांगेंवर घाव घातला.
परळी येथे पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. परळीतील जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व काही मदत केली मीच केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव पहिल्यांदा बीड जिल्हा परिषदेत मीच मांडला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या संस्करातून मी घडलो आहे. परळीतील जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व काही मदत केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव बीड जिल्हा परिषदेत व परळी नागरपालिकेत मांडला, असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले.
माझ्या हातून मी जरांगे पाटील यांचे एकदा उपोषण सोडले आहे. मी आतापर्यंत एक सभा सॊडलीतर जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर आरोप केले नाहीत. दोन प्रश्न विचारले होते त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिले नाहीत. मराठा समाजाचा फायदा ओबीसीमध्ये आहे की? ईडबल्यूएसमध्ये फायदा अधिक आहे? हा प्रश्न विचारला होता तर त्याचे उत्तर त्यांनी आतापर्यन्त दिले नाही, असेही मुंडे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून राग आतापर्यंत गिळला आहे. मात्र, जरांगे यांनी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. या चर्चेसाठी एकत्र येण्याची आमची तयारी आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे पुन्हा राज्यातील समतोल राखण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी पाच वर्षे विरोधीपक्षनेते म्हणून काम केले, त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मी पहिली भेट दिली, त्यावेळी आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही. बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणात मी वाटले. मनोज जरांगे यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्यावर आरोप केले नाहीत, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.
मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.