BJP local strategy : अमित शाहांच्या आदेशानंतर आता 'स्थानिक'साठी भाजप कुबड्या काढणार? शिंदे-अजितदादांची राजकीय कोंडी; महायुतीत 'स्वबळाचा' स्फोट होणार?

BJP local strategy Maharashtra News : एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात व अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या पुणे, पिंपरीत भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये भाजपने पुण्यात व ठाण्यात जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्त्यांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
eknath Shinde
eknath Shinde, amit shah, devendra fadnavis, ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जवळपास चार वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यातील 244 नगरपालीका व 44 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच दुसरीकडे मात्र, महायुतीमध्ये मात्र सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. भाजप मुंबई महापालिका वगळून अन्य ठिकाणी मित्रपक्षांच्या कुबड्या काढणार आहे. त्यामुळे त्याची सुरुवात भाजपने केली आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात व अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या पुणे, पिंपरीत भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये भाजपने पुण्यात व ठाण्यात जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्त्यांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपला (BJP) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत लागणार असल्याने त्याठिकाणी फक्त महायुती होण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणी इतर पक्षांची ताकद व स्थानिक समीकरणांचा अंदाज घेऊन निवडणुका लढवल्या जाणार आहेत. विशेषतः शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात व अजित पवारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच येथील निवडणुकीविषयी उत्सुकता लागली आहे.

eknath Shinde
BJP News : 'स्थानिक'साठी भाजप ॲक्शन मोडवर : बीडमध्ये धस-मुंडे वादावर तोडगा; लातूर, नांदेड, धाराशिवसाठीही खास रणनीती

नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचना केल्या होत्या. त्यावेळी अमित शाह यांनी भाजपने कुबड्या काढून टाकाव्यात असे आदेश दिले होते. त्यामुळे भाजप येत्या काळात या आदेशाची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भाजप जोरदार तयारीला लागला असल्याचे दिसत आहे.

eknath Shinde
NCP Politic's : साहेबांच्या पक्षाचा शहराध्यक्षच अजितदादांच्या गळाला लागला; ऐन निवडणुकीत पवारांना धक्का

विशेष म्हणजे या कुबड्या काढण्याची सुरूवात भाजपने अजितदादांच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यातून आणि एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) गड असलेल्या ठाण्यातून केली असल्याचे दिसत आहे.येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती आखण्यात आली आहे. एकीकडे पुण्यात अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने पाच मातब्बर नेते मैदानात उतरवले आहेत.

eknath Shinde
BJP Kolhapur elections : धनंजय महाडिकांवर भाजपचा विश्वास; कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सूत्रे हातात

पुणे जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यासाठीच भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर सोपवली आहे. त्यासाठी पुणे महापालिकेसाठी त्यांच्यासोबत गणेश बिडकर हे असणार आहेत तर पिंपरी-चिंचवडसाठी आमदार शंकर जगतापांवर जबाबदारी असणार आहे. तर मावळ भागातील निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगेंवर असणार आहे तर आमदार राहुल कुल यांच्यावर बारामतीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे ही मात्तब्बर मंडळी रिंगणात उतरवली असल्याने याठिकाणी भाजपची वाटचाल स्वबळावर दिसत आहे.

eknath Shinde
Bjp News : चंद्रकांत पाटील, बावनकुळेंसाठी CM फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन? स्थानिकच्या निवडणुकीसाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र फोकस

ठाण्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे व गणेश नाईक यांचे पटत नसल्याने याठिकाणी महायुती होणार नसल्याचे समजते. ठाणे शहरची जबाबदारी संजय केळकर यांच्यावर तर ठाणे ग्रामीणची जबाबदारी कपिल पाटील यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. गणेश नाईक व संजय केळकर यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार असल्याने दोघेही एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतील, असे दिसत नसल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

eknath Shinde
Uddhav Thackeray Video : 'त्या' चर्चांमधील उद्धव ठाकरेंनी हवाच काढली; एकनाथ शिंदेंसोबत युतीबाबत स्पष्ट संदेश, म्हणाले 'निवडणुकीनंतरही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com