Mumbai News : मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठा निर्णय दिला. गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पाहता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावे आणि वाद मिटवावा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी देत निशाणा साधला.
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयात करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत. वांद्रेतील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना 1 लाख 25 हजार आणि मुलगी शिवानी मुंडे यांना 75 हजार रुपयांची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला आहे. यावेळी कोर्टाने धनंजय मुंडेवर करुणा शर्मानी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य केले आहेत.
या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी घेऊन जावे आणि वाद मिटवावा’, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला. करूणा मुंडेंचा वनवास संपवला पाहिजे. त्यांना येत्या काळात न्याय द्या, नाहीतर कर्माची फळं वाईटपणे भोगावे लागतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला.
मुंडे यांच्या कौटुंबिक वादात आम्हाला पडायचे नाही तुम्ही तिला न्याय द्या, वाद मिटवा आणि घरी घेऊन जा, असा सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) दिला. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर भाष्य केले आहे. “करुणा शर्मा या 25 हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षा दिली पाहिजे. कारण हे तिचाही घातपात करू शकतात”, असे धक्कादायक विधान अंजली दमानिया यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.