Congress News : युवकांच्याही डोक्यात भिनली ज्येष्ठांची गटबाजी

Youngsters and Groupism News : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त 16 आमदार विजयी झाले. त्यातील डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि विकास ठाकरे या तीन आमदारांच्या नव्या पिढीतही जुना संघर्ष बघायला मिळत आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

प्रमोद बोडके

Mumbai News : महाराष्ट्र कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमधील ही गटबाजी आता युवक कॉँग्रेसच्याही डोक्यात भिनली आहे. नागपूरमधील आंदोलनाच्या गैरहजेरीचा मुद्दा पुढे करत युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलेला हा वार शिवानी वडेट्टीवार व केतन ठाकरे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही बसला. ज्येष्ठांमधली गटबाजी मिटविण्यापूर्वीच आता युवक काँग्रेसच्या गटबाजीचा नव्या अध्याय समोर आला आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त 16 आमदार विजयी झाले. त्यातील डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि विकास ठाकरे या तीन आमदारांच्या नव्या पिढीतही जुना संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभेच्या मैदानात दारुण पराभूत झालेल्या काँग्रेसमध्ये (Congress) कोणाची ताकद अधिक आहे? हेच दाखविण्याचा प्रयत्न यातून होताना दिसते. राम मंदिराची उभारणी झाली तेंव्हापासून खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. या वक्तव्याच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसने नागपुरातील महाल येथील संघ मुख्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनासाठी युवक काँग्रेसचे 50 पदाधिकारी/कार्यकर्ते हजर तर 60 पदाधिकारी गैरहजर होते.

Congress
Dhananjay Munde Latest News : करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल लागताच धनंजय मुंडेंकडून खुलासा; आर्थिक स्थिती पाहून...

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब व राष्ट्रीय महासचिव अक्षय चिकारा यांनी महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या गटबाजीचा आँखो-देखा हाल अनुभवला आहे. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलेल्या कारवाईचा घाव अधिक खोल मानला जात आहे. नागपुरातील युवक कॉँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनातील कारवाई फसणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शेवट कसा होतो? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नागपुरातील काँग्रेसचा युवक किमान आंदोलन (फेल गेलेले का असेना) तरी करतो, राज्यातील इतर जिल्ह्यातील/विभागातील काँग्रेसचा युवक सध्या काय करतोय?, याचा बारकाईने शोध घेण्याची आवश्‍यकता आहे.

Congress
Karuna Munde : करुणा मुंडे ढसाढसा रडल्या, सर्व सांगितलं; जेलमधील दिवस ते धनंजय मुंडेंसमोर वाल्मिक कराडने केलेल्या मारहाणीपर्यंत...

झोपलेला कार्यकर्ता मतदारांना करतोय जागे

लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. 25 जानेवारी) राज्यभर आंदोलन केले. आंदोलनानंतर काँग्रेस खासदार, आमदार व प्रमुख नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या. विधानसभेतील निकाल पुन्हा एकदा आठवून काँग्रेसने मतदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न झोपलेला अन्‌ आत्मविश्‍वास हरवलेला कार्यकर्ता करत असल्याने हे आंदोलन फक्त फोटो सेशन अन्‌ सोशल मिडियावरील पोस्ट पुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसले. लोकसभा निवडणूक 2019 ते 2024 या पाच वर्षात राज्यात 50 लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 या सहा महिन्यात 46 लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे? याचे उत्तर काँग्रेस नेते शोधत आहेत.

Congress
Seeshiv Munde News : धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिव मैदानात; आई करुणा मुंडेंवर गंभीर आरोप

देशमुख प्रदेशाध्यक्ष, पाटील विरोधी पक्षनेते?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते शिवसेना (Shivsena) उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे हा फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरल्याचे समजते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत २९ ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यानंतर हे पद काँग्रेसकडे व काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्याकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी येऊ शकते.

प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरुवातील नको-नको म्हणणारे आमदार अमित देशमुख यांना या पदासाठी तयार केल्याचे समजते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी लवकरच अमित देशमुख यांच्याकडे येऊ शकते. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पाहता देशमुख-पाटील यांची नव्या दमाची जोडी काँग्रेस मैदानात उतरवू शकते. देशमुखांच्या माध्यमातून मराठवाड्याला संधी, पाटलांच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राला संधी दिल्यास विदर्भाला संधी विधीमंडळ पक्ष नेता, गटनेता, प्रतोद या माध्यमातून मिळू शकते.

Congress
Eknath Shinde On Mahayuti : अशोक चव्हाण यांच्या 'स्वबळा'ची हवा एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्येच काढली!

युवकांच्या निवडणुका तोंडावर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजपने नोंदणी अभियान सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे युवकांच्या निवडणुका असल्याने राज्यातील भाजपचा युवक सध्या सदस्य नोंदणीसाठी युद्धपातळीवर कामाला लागलेला दिसत आहे. काँग्रेसमधील युवकांच्या हातालाही असेच काम देण्याची आवश्यकता आहे.

Congress
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

लोकसभा व विधानसभेतील निवडणुकीनंतर पक्षाचे नेटवर्क तळापर्यंत पोहोचविण्यासाठी या निवडणुका महत्वाच्या ठरतात. मात्र याही निवडणुकीसाठी पक्षसंघटन बळकट करण्यासाठी कॉँग्रेस व त्यातही महत्वाची युवक शाखा असलेली युवक कॉँग्रेसनेही लवकरात लवकर सक्रीय होणे आवश्यक आहे.

Congress
Devendra Fadnavis : जिल्हा विभाजनाचा मुद्दाच फडणवीसांनी एका झटक्यात निकाली काढला; म्हणाले, 'जे चालले आहे ते..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com