MLA Ambadas Danve On Munde-Kokate News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve On Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, आता कोकाटेंचा नंबर! अंबादास दानवेंचा इशारा

Dhananjay Munde's resignation creates political turmoil, with Manikrao Kokate being speculated as the next in line. : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पावणे तीन महिन्यापूर्वी खंडणीच्या प्रकरणातून हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आले याचे पडसाद राज्यभरात अडीच महिन्यापासून उमटत आहेत.

Jagdish Pansare

Budget Session 2025 : मुंबई विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने गाजणार हे सर्वश्रुत होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडलेही तसेच. विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात मंत्री धनंजय मुंडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

आज दुसऱ्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला पाठीशी घातल्याचा आरोप असलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला. यावर काल विधान परिषदेत मुंडे, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आता कोकाटे यांचा नंबर, असे म्हणत इशारा दिला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पावणे तीन महिन्यापूर्वी खंडणीच्या प्रकरणातून हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आले याचे पडसाद राज्यभरात अडीच महिन्यापासून उमटत आहेत. (Ambadas Danve) याप्रकरणी सीआयडी, एसआयटी चौकशी सुरू असून वाल्मीक कराडसह आठ आरोपींवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सीआयडी कडून दाखल करण्यात आलेल्या दीड हजार पानांच्या दोषारोपपत्रामध्ये भयंकर गोष्टी समोर आल्या आहेत.

त्यातच काल संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा कशाप्रकारे छळ करण्यात आला याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. याचे तीव्र पडसाद राज्यात विशेषत: बीड आणि मराठवाड्यात उमटायला सुरुवात झाली आहे. बीड जिल्हा बंद दरम्यान धनंजय मुंडे, अजित पवार यांचे बॅनर फाडून रस्त्यावर टायर जाळण्याचे प्रकार समोर येत आहेत.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

सभागृहात देखील या दोघांच्या राजीनाम्यासाठी आम्ही सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर आहे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT