Manikrao Kokate : मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यावर निर्णय होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात सांगून टाकले

CM Devendra Fadnavis Legislative Council resignation Nashik NCP Minister Manikrao Kokate : न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यात महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर विधान परिषदेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून, त्यांच्या राजीनाम्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न केला. त्यावरून सभापती, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यावर कधी निर्णय होणार याची माहिती सभागृहाला दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्याअगोदर बोलू द्यावे, अशी विनंती केली होती. सभापती राम शिंदे यांनी त्यानुसार दानवे यांना बोलण्यास परवानगी दिली. अंबादास दानवे यांनी सभागृहाचा मुद्दा नसला, तरी राज्याचे मंत्रिमंडळच्या अनुषंगाने हा विषय आहे, असे सांगून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेकडे लक्ष वेधले.

Manikrao Kokate
Kanifnath Yatra : पुन्हा ठराव घ्या, बघतोच कसा रद्द होतो; मंत्री राणेंचा महाराष्ट्रभर निर्णयाच्या इशाऱ्यानं तणाव

विधानसभेच्या सभागृहातील सदस्यांच्या अनुषंगाने विषय असल्याने तो खालच्या सभागृहात होईल ना, यावर बोलायचे असल्यास उद्या बोलता येईल, असे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी सांगितले. त्यावर दानवे यांनी यावर सभागृह नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल, असे म्हणून मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती नाही. तर सरकारची भूमिका काय आहे? मंत्र्याला शिक्षा झालेली आहे. ती शिक्षा दोन वर्षांची आहे. याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.

Manikrao Kokate
Himani Murder : 'अत्याचार, मारहाण आणि अंमली पदार्थ', हिमानीच्या पोस्टमॉर्टममध्ये धक्कादायक खुलासा

सभापतींनाच विरोधकांनी घेरलं

सभापती राम शिंदे यांच्या विधान खोडून काढताना, विरोधकांनी मंत्री हा दोन्ही सभागृहाचे असल्याकडे लक्ष वेधले. मंत्र्याला शिक्षा झाली आहे, त्यामुळे हा प्रश्न खालच्या सभागृहाचा होऊ शकत नाही, राज्याचा मंत्री आहे, दोष सिद्ध झाला आहे, याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर सभापती आणि विरोधकांच्या या गोंधळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला.

फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "देशाचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावा दिवशी, असा गोंधळ होईल, असे वाटलं नव्हते. विरोधी पक्षनेत्यांना एवढं सांगतो की, आपण मंत्री महोदयाच्या संदर्भाचा मुद्दा मांडता आहात, त्यासंदर्भात कोर्टानं सुनावणी पूर्ण केली आहे. आणि 'क्लोज फॉर ऑर्डर' ठेवलेलं आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com