Dhananjay Munde Ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : अजितदादा दांडीबहाद्दर धनुभाऊ आजारी असल्याचं सांगत होते; पण मुंबईतील 'फॅशन शो'नं सगळंच उघडं पाडलं!

Dhananjay Munde absent in Ajit Pawar's program : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता.2) बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांचे विश्वासू असणारे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज (ता. 2) जिल्ह्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. पण या वेळी माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. यावरून आता नवी चर्चा सुरू झाली असून ते आजारी असल्याने अनुपस्थित होते, असे म्हटलं जात आहे. पण ते नाराज असल्यानेच या कार्यक्रमांकडे त्यांनी पाठ केल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांच्या दरम्यान धनंजय मुंडे मुंबईतील एका फॅशन शो ला उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे बीडमध्ये नव्हते. यामुळेच ते कोणत्याच कार्यक्रमाला हजर नव्हते. याबाबत भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील विचारले असता त्यांनी ते आजारी असून यामुळेच आले नसावेत असे स्पष्टीकरण दिले होते. पण आता धनंजय मुंडे बीड नाही तर अजित पवारांच्या दौऱ्याआधीच बाहेर असल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे हे मुंबईत एका फॅशन शो ला उपस्थित होते. ते मुलीच्या फॅशन शो ला उपस्थित असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे नसल्याने विविध चर्चा उधान आलं होतं. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण आजारी असून उपचारासाठी मुंबई जावं लागणार आहे. यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी बीडमध्ये उपस्थित राहू शकणार नाही. कुणीही संभ्रम निर्माण करू नये, असे सोशल मिडियावर एक पोस्ट करत सांगितले होते.

पण आता उपचाराचे कारण सांगणारे धनंजय मुंडे एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात त्यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने सहभाग घेतला होता. याच कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे मंगळवारी रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांना आपले मंत्री पद देखील सोडावे लागले. यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणे टाळले आहे. याचदरम्यान त्यांनी आजारपणाचे कारण देत पक्षाचे नेते अजित पवार यांच्याच कार्यक्रमांना दांडी मारल्याचे आता चर्चांना उधाण आले आहे. तर आज दांडी मारणारे काल कसे आजारी असाही सवाल आता उपस्थित केला जातोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT