
Dhananjay Munde News : उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज (बुधवार) बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांच्या आढाव्यासोबत अधिकाऱ्यांची बैठक अजित पवार घेणार आहेत. या दौऱ्यामध्ये आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, आज सकाळी ट्विट करत आपण अजितदादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
अजित पवार बीडमध्ये आलेले असताना धनंजय मुंडे हे मुंबईत आहेत. ते मंगळवारीच मुंबईत दाखल झाले. 'माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल (मंगळवारी) मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली होती.', असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करताना याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, असे आवाहन केले आहे. आपण या दौऱ्यात उपस्थित राहणार होतो मात्र प्रकृतीच्या कारणाने उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वतः प्रकृतीच्या कारणाने अजित पवारांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे. मात्र, मुंडेंच्या अनुपस्थितिबाबत चर्चांना उधाण आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देत असल्याचे सांगितले. बीडमधील परिस्थिती पाहता मुंडेंपासून अजित पवार हे अंदर राखत असल्याची देखील चर्चा आहे.
अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना आज सकाळी त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ते म्हणाले, मी आज दुपारी बैठक घेणार आहे. त्यामुळे बैठकीत आमच्याकडे माहिती नाही, अशी कारणं सांगू नका. तुमच्याकडे चार तासा आहेत. या चारतासात अपटूडेट माहिती घ्या आणि मला द्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.