EX Minister Dhananjay Munde News Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde News : मनःशांतिसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात!

In a quest for mental peace, former Maharashtra minister Dhananjay Munde is attending a 10-day Vipassana meditation course at the Igatpuri : मुंडे यांच्याकडे असलेले मंत्री पद आणि अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवल्यानंतर ते कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते.

Jagdish Pansare

Beed Political News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत आलेले आणि मंत्रीपद गमवावे लागलेले धनंजय मुंडे मन:शांतिसाठी विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची माहिती आहे. गेल्या आठ दिवसापासून मुंडे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मेडिटेशन घेत आहेत.

कौटुंबिक वाद, राजकीय नुकसान, सातत्याने होणारे गंभीर आरोप, त्यात प्रकृती बिघडत असल्याने सध्या चोहोबाजूने अडचणीत सापडलेले माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या सगळ्या वातावरणापासून अलिप्त राहू इच्छित आहेत. राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा सगळ्या संकटावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा मार्ग म्हणजे मेडिटेशन अन् मनःशांति. मुंडे आता याच मार्गाने निघाले आहेत.

नाशिकजवळच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात आठवडाभरापासून मुंडे दाखल झाल्याची माहिती आहे. (Beed News) सगळ्या वाद आणि आरोपानंतर राजकारणात आपले पुनरागमन आणि गेलेले मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा धनंजय मुंडे बाळगून होते. परंतु मुंडे यांच्याकडे असलेले मंत्री पद आणि अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवल्यानंतर ते कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते.

यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातही मतभेद झाल्याची चर्चा आहे. अगदी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुजबळांना मंत्री करण्याचा निर्णय आपला नाही, तर मुख्यमंत्र्‍यांचा असल्याचे पटवून दिले.

एकूणच आपले राजकीय खच्चीकरण केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता काही दिवस या सगळ्या वाद आणि वातावरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार मुंडे यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात आठवडाभरापुर्वी नाव नोंदणी करून ते तिथे दाखल झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दहा दिवसांच्या विपश्यनेसाठी ते दाखल झाल्याचे सांगीतले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT