Dhananjay Munde : भुजबळांना खातंही मुंडेंचं अन् बंगलाही मुंडेंचा, धनंजय मुंडेंना 15 दिवसांत सातपुडा खाली करण्याचे आदेश

Dhananjay Munde’s Satpuda Bungalow allotted to Chhagan Bhujbal after ministerial reshuffle : धनंजय मुंडेच्या सध्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Chhagan Bhujbal Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं पद आणि कार्यालय हे छगन भुजबळ यांना वर्ग करण्यात आलेलं आहे. त्यापाठोपाठ आता धनंजय मुंडेच्या सध्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा पासून धनंजय मुंडे यांचे हे खाते अजित पवार यांच्याकडे होते. मात्र पहिल्यांदा मंत्रीमंडळ विस्तारामध्ये वगळलेल्या छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद मिळालं आहे. आता अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी गुरुवारी पदभार स्विकारला. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा सातपुडा बंगला देखील छगन भुजबळ यांना दिला जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र तरीही अद्याप सातपुडा बंगला हा मुंडेंच्याच ताब्यात आहे. त्यांना पुढच्या पंधरा दिवसांत बंगला खाली करण्याचे आदेश दिल्याने या महिना अखेरीला मुंडे बंगला खाली करणार आहेत. सध्या या बंगल्याचं गेट बंद ठेवण्यात आलं असून याठिकाणी बंदोबस्तला असलेल्या पोलिसांना बंगल्यात कुणालाच न सोडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Nashik Politics : सात आमदार त्यातले तीन मंत्री, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा वाढला; भाजपलाही टाकलं मागे

छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कुठलं खातं वर्ग करण्यात येईल याची उत्सुकता व फार चर्चा माध्यंमात होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले. शिवाय भुजबळांनी याआधीही या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं आहे, म्हणूनही भुजबळांना हे खातं मिळेल असा अंदाज सुरुवातीपासूनच होता.

महाविकास आघाडीचे सरकार असताना छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हेच खातं होतं. धनंजय मुंडे यांच्यासाठी अनलकी ठरलेलं हेच खातं आता भुजबळांना लकी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे.

Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate : कोकाटे भाजपातून राष्ट्रवादीत आले, भुजबळांच्या पाठिशी उभे राहिले... पण आता शत्रू का?

दरम्यान खात्याचा पदभार स्विकारताना भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझी आजवर ९ ते १० वेळा मंत्रिमंडळात एण्ट्री व एक्झिट झाली. ९ ते १० वेळा पदभार स्विकारला आणि सोडला. पण अन्न आणि नागरी पुरवठा खांत हे माझ्याकडे तिसऱ्यांदा आल्याचा आनंद आहे. शरद पवारांसोबत असताना, महाविकास आघाडीमध्ये असताना व आता नंतर महायुतीसोबत आल्यावर पुन्हा हे खातं आपल्याकडे आलं आहे. असं भुजबळांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com