मुंबई : गुजरात, कर्नाटक,दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे (Omicorn Variant) रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईतही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. काल कल्याण डोंबिवलीमध्ये राज्यातील (Maharashtra Omicorn update) ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यानंतर आता धारावीचा परिसर देखील ओमायक्रॉनच्या छायेत आली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सरकारसह प्रशासन सतर्क झाले असून, महापालिकेने पुन्हा एकदा पंचसुत्री हाती घेणार असल्याचे सांगितले आहे.
टांझानियामधून परतलेल्या प्रवाशाला सध्या 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंग चाचणीकरता कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे. या स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. या प्रवाशाच्या कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली आहे, त्यांचे रिपार्ट्स उद्या येणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेने बरीच काळजी घेतली आहे. हाय रिस्क ठिकाणांहून मुंबईत आलेले प्रवाशांची तपासणी, उपचार करत आहेत.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, वॉर रुम सज्ज आहे. हाय रिस्क कंट्रीतु आलेल्या प्रवाशांना कॉल जात आहेत. मात्र ओमायक्रॉन येवूच नये यासाठी पंचसूत्री कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेतला आहे. रुग्णांची बॅक हिस्ट्री चेक केली जाईल. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मास्क आणि सोशल डिस्टंन्सींग हा प्रमुख उपाय असल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीमध्ये :
महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण काल डोंबिवलीमध्ये आढळला आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेला आहे. या तरुणाला सौम्य ताप आला होता. त्याला इतर कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ताप आल्यामुळे त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले असता त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.