Devendra Fadnavis Dharmendra Pradhan Eknath Shinde (1).jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Dharmendra Pradhan News : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार? CM फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

Cocroach Janta Party: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. तरुणांनी एकत्र येत केंद्रातील मोदी सरकारला अखेर झुकवलं आहे. सव्वा दोन महिन्यांतच मोदी सरकारमधील पहिला राजीनामा पडला आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. तरुणांनी एकत्र येत केंद्रातील मोदी सरकारला अखेर झुकवलं आहे. सव्वा दोन महिन्यांतच मोदी सरकारमधील पहिला राजीनामा पडला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीसह विरोधकांकडून एकीकडे जल्लोष सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे मोदी सरकार अॅक्शन मोडवर आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मेगा बैठक होणार असल्याची माहिती आहे.

याचदरम्यान, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही तातडीनं दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 1 महिन्यांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे उचलून धरण्यात आली होती. तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही जंतर मंतरवर उपोषणालाही बसले. याचदरम्यान, सीजेपीनं 20 जुलै रोजी संसदेवर भव्य मोर्चाही काढण्यात आला.

दिल्लीतील सीजेपीनं संसदेवर काढलेल्या मोर्चामध्येच विद्यार्थी आंदोलक आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्षाची मोठी ठिणगी पडली. यावेळी पोलिसांनी आंदोलक आणि सीजेपी एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं. त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच लाठीचार्जही करण्यात आला. याचमुळे देशभरात संतापाचा उद्रेक झाला.

एकीकडे सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असतानाच दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी तब्बल 25 दिवस उपोषण केलं होतं. मात्र, त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी भाजप नेते जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत मध्यरात्री रुग्णालयात अचानक आपलं उपोषण सोडलं. पण यानंतरही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं सीजेपीनं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT