Student Protest: अभिजीत दीपकेंना गंभीर आजाराची लागण होताच आई-वडिलांची चिंता वाढली : मोदी सरकारला कळकळीची विनंती

Abhijit Deepke, Dharmendra Pradhan, Student Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या पालकांनी सरकारने तातडीने चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.
Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narrativesSarkarnama
Published on
Updated on

Abhijit Deepke: जंतर मंतरसह देशभर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी आंदोलन होत आहे. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडली असून, त्यांना टायफॉइड झाल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. यापूर्वी त्यांना कधीही असा त्रास झाला नव्हता, असे त्यांच्या पालकांनी सांगितले.

Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
CJP मोर्चावेळी 'पॅलेट गन'चा वापर? आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी; केव्हा अन् कसा होतो वापर?

त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची आम्हाला मोठी चिंता वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

मात्र, दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही असे सांगत आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. तसेच सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या आई-वडिलांनी केला आहे.

Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
'केंद्रात नरेंद्र अन् शिक्षण खात्यात धर्मेंद्र...'; CJP च्या आंदोलनावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

सरकारने अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक चर्चा करावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपापल्या घरी परततील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com