Dhananjay Munde - Pankaja Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde Wishes Pankaja: `ताई तुझ्या हातून कायम सत्कार्य घडो`, मंत्री मुंडेंच्या बहिणीला शुभेच्छा...

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजा यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत मुंडे यांनी `माझ्या भगिनी, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ताई, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो व तुझ्या हातून कायम सत्कार्य घडो, ही प्रभू वैधनाथास प्रार्थना`, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या देतांना पंकजा यांच्यासोबतचा हसतमुख फोटो देखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो बराच बोलका असून या दोघांच्या नात्यांमधील कटुता कमी झाल्याचे दर्शवतो. (Pankaja Munde) एकाच कुटुंबात जन्मलेल्या पण राजकारणात मतभेदांमुळे वेगळ्या वाटेवर चालत असलेल्या या बहिण-भावांमधील वैर कमी होत असल्याने त्यांच्या समर्थकांना देखील आनंदच होत असणार. गोपीनथ मुंडे हयात असतांनाच पुतणे धनंजय यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासूनच आधी काका-पुतणे आणि नंतर बहिण-भावाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.

पुढे तो अधिकच वाढत गेला आणि हे बहिण-भाऊ एकमेकांच्या विरोधातच उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. रक्ताचे नाते आणि राजकारण या दोन्हीमध्ये फरक आहे हे दोघांनीही वेळोवेळी दाखवून दिले. (Marathwada) गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर खचलेल्या पकंजा यांना भाऊ म्हणून धीर देणारे, कोरोना झाल्यानंतर भावाच्या भेटीला राजकीय वैर विसरून धावत जाणारी बहिण, कार अपघातातून बचावलेल्या भावाच्या काळजीपोटी भेट देवून सगळं काही ठीक होईल, असा विश्वास देणारी बहिण अशा अनेक प्रसंगातून या दोघांचे नाते घट्ट असल्याचे जाणवले.

पण राजकारण आले की तिथे हे दोघेही एकमेकांवर टीक करतांना मागेपुढे पहायचे नाही, याचा अनुभव देखील जनतेला आला. परंतु काही महिन्यांपुर्वी गहिनीनाथ गडावर झालेल्या एका कार्यक्रमाने महंत नामदेवशास्त्री यांच्या साक्षीने या दोघांनी एकमेकांमधील कटुता नाहीसी करण्याचा संकल्प केला. तो पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला. मग जवाहर शिक्षण संस्थेची निवडणूक असो, की वैद्यनाथ साखर कारखाना इथे दोघांनी दाखवलेला सयंम आणि समजूतदारपणा याचे कौतुक झाले.

धनंजय मुंडे यांची दुसऱ्यांदा राज्याच्या मंत्रीमंडळात निवड झाली तेव्हा पंकजा यांनी त्यांचे ओवाळून केलेले कौतूक हे पाहून दोघांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या वक्तव्यांमुळे पक्षातील नेत्यांशी घेतलेल्या वाईटपणामुळे राजकीय नुकसान होऊ शकते, असा सल्ला देत संयम ठेवण्याचा सल्ला देखील धनंजय यांनी काही दिवसांपुर्वी पंकजा यांना दिला होता. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या बहिण-भावांमधील दुरावा कमी होत असल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT