Aditya Thackeray, Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Aditya Thackeary : दिशा सालियनप्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? आदित्य ठाकरे म्हणाले, 'कचऱ्याकडे..'

Uddhav Thackeray Call News : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून या दोघांमध्ये आडवा विस्तवही जात नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप होत असतानाच एका मुलाखतप्रसंगी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनप्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, आदित्य ठाकरेंनी उत्तर देताना मंत्री नितेश राणेंना कचऱ्याची उपमा देत मी त्याकडे लक्ष देत नसल्याचे स्पष्ट केले.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच, दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्या वकिलानेही आदित्य यांच्यासह काही सेलिब्रिटींवरही गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण जेव्हा झाले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केले होते, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, महापालिकेला फोन करुन सांगतो की कुठेतरी कचरा पडलाय, पण मी लक्ष देत नाही, असे उत्तर आदित्य यांनी दिले.

निवडणुका आल्या किंवा भाजप (BJP) अडचणीत आल्यानंतर हे प्रकार सुरु होतात, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप खोडून काढले. अधिवेशन काळात भाजप जेंव्हा अडचणीत येते, तेंव्हा भाजपकडून काही ना काही मुद्दे काढते. मग, औरंगजेब असेल, अबू आझमी असेल आणि आता मी आहे. गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. त्यासोबतच सत्ताधाऱ्यांकडे कुठलेच व्हिजन नसल्याची टीका ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) उत्तर देताना मंत्री नितेश राणेंना कचऱ्याची उपमा दिली. तसेच, नितेश राणेंचं नाव घेताच... शीsss अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनीच कोर्टाकडे आता धाव घेतली आहे, असे आदित्य यांना विचारले असता प्रश्न कोर्टात आहे, आम्ही कोर्टात बोलू, असे उत्तर आदित्य यांनी दिले.

कार्यकर्त्यांवर गुन्हे पडतात

भाजपमधील नेते, मंत्र्याची मुले अधिकतर परदेशात शिकली आहेत. काही परदेशात व्यवसायात आहेत. दंगलीत हिंदू आणि मुस्लीम पोरांवर केस पडल्या आहेत. या नंतरच्या काळात नोकरी व्यवसाय करताना पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यासाठी बॉसकडे जावे लागते. मरतोय कोण, गरीब माणूस मरत आहे. आगी लावणाऱ्यांचे काही जात नसल्याचेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT