Nagpur Violence: नागपुरची दंगल कुणामुळे ? मौलानांनी लिहिलं अमित शहांना पत्र

Maulana Shahabuddin Razvi Letter to Amit Shah : छावा’चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रिजवी यांनी केली आहे.
chhava
chhavaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 21 March 2025: नागपूर कुणी पेटवलं, हिंसाचाराला कारणीभूत कोण आहे, यांचा तपास नागपूरचे पोलिस करीत आहे. अशातच ही दंगल कशामुळे झाली हे सांगत उत्तर प्रदेशात एका मौलानांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या घटनेला कोण जबाबदार आहे, यांचे कारण सांगत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

'छावा'चित्रपटात औरंगजेब याला हिंदू विरोधी असल्याचे दाखवत हिंदू युवकांना भडकवण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे 17 मार्च रोजी नागपुरात दंगल झाली. याला 'छावा'चित्रपट जबाबदार आहे, या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी बरेली येथील मौलाना यांनी केली आहे.

'छावा’चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रिजवी यांनी केली आहे. दोन्ही समाजातील व्यक्तींनी शांती राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

chhava
Satyendar Jain: AAP च्या माजी मंत्र्याचा पाय आणखी खोलात! CCTV गैरव्यवहारात ACBची मोठी कारवाई

राज्य अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने या सर्व घटनेची दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पोलिसांसोबत बैठक घेऊन या घटनेची कारणे जाणून घेऊन त्यांनी पडद्यामागचे सूत्रधार शोधण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी त्यांनी ही दंगल औरंगजेबाच्या कबरीवरून झाली नसल्याचे स्पष्ट केले.

नागपूरच्या सायबर पोलिस विभागाने गुरुवारी नव्याने चार गुन्हे दाखल केले आहेत. यात एकूण ३४ लोकांना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर दंगलीस चिथावणी देणे, साहित्य गोळा करणे, लोकांना भडकावणे तसेच सोशल मीडियाचा वापर करून दंगलीच प्रोत्साहित करण्याच्या कलमा दाखल केल्या आहेत.

chhava
Karnataka Politics: होऊ दे खर्च! 'हवाई सफरी'वर मुख्यमंत्र्यांची कोटींच्या कोटी उड्डाणे; जनतेच्या पैशांची उधळपट्टी!

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही समाजकंटकांनी त्याला विरोध दर्शवण्यासाठी तुफान दगडफेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे नागपूरमध्ये दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तीन दिवसांपासून नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com