Adv Nilesh Ojha Guilty sarkarnama
महाराष्ट्र

Disha Salian Case : ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'त्या' वकिलावर मोठी कारवाई

Contempt in court Adv Nilesh Ojha Guilty : नीलेश ओझा यांनी केलेले वक्तव्याबाबत हायकोर्टातील बेंचसमोर सुनावणी पार पाडली. या सुनावणीमध्ये ओझा यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप ऐकवण्यात आली.

Roshan More

Adv Nilesh Ojha News : दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिच्या हत्या करण्यात आला असल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केली होती. त्यांनी अ‍ॅड. नीलेश ओझा यांच्या मार्फत या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत आदित्य ठाकरे, सुरज पांचोली यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ज्या अ‍ॅड. नीलेश ओझा यांच्या मार्फत याचिक दाखल केली होती त्याच नीलेश ओझा यांची अडचण वाढली आहे.

दिशा सालियन प्रकरणात अ‍ॅड. नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाचा अवमान आणि बदनामी होईल, असे वक्तव्य केले होते. त्यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणात न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांचे नाव घेत अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पणी करत

आरोप लावले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अ‍ॅड. ओझा यांच्या विरोधात अवमानाची कारवाई सुरू केली आहे.

प्रतिमा मलिनचा ठपका

नीलेश ओझा एक एप्रिलला घेललेल्या पत्रकार परिषदेमध्ये न्यायव्यवस्थेविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायालयाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका त्यांच्यावर आणि दिशाचे वडील सतीश सालियान यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अ‍ॅड. ओझा कारवाईला पात्र

ओझा यांनी केलेले वक्तव्याबाबत हायकोर्टातील बेंचसमोर सुनावणी पार पाडली. या सुनावणीमध्ये ओझा यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप ऐकवण्यात आली. त्यांची वक्तव्य ऐकून बेंचमधील न्यायाधीशांनी त्यांना चांगलेच खडसावले. ओझा यांची वक्तव्ये न्यायालयाची अवमान करणारी आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य अत्यंत चुकीची आहेत त्यामुळे ते कारवाईस पात्र असल्याचा निकाल बेंचने दिला. तसेच ओझा यांनी केलेले वक्तव्य ज्या युट्यूब चॅलेवरून तसेच वृत्तवाहिन्यांमधून प्रसिद्ध केली आहेत तेथून ती काढून टाकण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले.

अ‍ॅड ओझा काय म्हणाले?

न्यायालयाने दिलेल्या आदेशावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड ओझा म्हणाले, हा आदेश परत घेण्यासाठी नोटीस डिस्चार्ज तसेच रिकॉल ऑफ द ऑर्डरसाठी न्यायालयात अर्ज करणार आहे. न्यायालयाने म्हटले की, मी जेव्हा आरोप केले तेव्हा ते न्यायालयाच्या बाहेर नाही तर त्याच न्यायमूर्तींसमोर किंवा जेव्हा त्या न्यायमूर्तींना केसमधून माघार घेण्याची विनंती करायची होती, तेव्हा करायला पाहिजे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT