Crorepati farmer : केवळ 'हे' एक झाड यवतमाळच्या एका शेतकऱ्यास बनवणार आहे लवकरच कोट्यधीश!

Yavatmal farmer turns millionaire : जाणून घ्या, नेमकं कोणतं आहे ते झाड आणि कसा काय बनणार आहे तो शेतकरी कोट्यधीश?
Crorepati farmer
Crorepati farmersarkarnama
Published on
Updated on

Yavatmal farmer and Red sandalwood tree News : शंभर वर्ष जुन्या लाल चंदनाच्या एका झाडामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एक शेतकरी लवकरच कोट्यधीश होणार आहे. दुसरीकडे याच झाडामुळे रेल्वेला तब्बल एक कोटीचे ‘चंदन' लागले आहे. सध्या ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार जमा करण्यात आली असून संबंधित चंदनाच्या झाडाचे मूल्यांकन केले जात आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी (ता. पुसद) गावातील शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला मिळाला. परंतु, लाल चंदनाच्या वृक्षाचा मोबदला मिळाला नसल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने शेतकऱ्याला मोबदला म्हणून तुर्तास एक कोटी रुपये देण्याचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानुसार, एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली.

Crorepati farmer
Abu Azmi on Khulatabad renaming : ''...तर मी म्हणतो एका जागेचंच नाही संपूर्ण देशाचं नाव बदला, आम्ही स्वागत करू'' ; अबू आझमींचं मोठं विधान!

केशव शिंदे असे या याचिकाकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात आला. परंतु ८ फेब्रुवारी २०१८ रोजी पुसदच्या जमीन संपादन अधिकाऱ्याने लाल चंदनाच्या वृक्षासह इतर झाडे आणि जमिनीखालील पाईपलाइनच्या मूल्यांकनानुसार मोबदला देण्याची याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर याचिकाकर्त्याने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही अर्ज सादर केला. परंतु, मोबदला मिळाला नसल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

८ फेब्रुवारी २०१८ रोजी पारित केलेला मोबदला रद्द करावा आणि लाल चंदनाचे वृक्ष, इतर वृक्ष आणि जमिनीखालील पाईपलाइनच्या मूल्यांकनानुसार मोबदला देण्याचे आदेश राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती केली.

Crorepati farmer
PMC notice to Dinanath Hospital : अखेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुणे महापालिकेने बजावली नोटीस; दोन दिवसांत जर...

न्यायालयाने शेतकऱ्याला मोबदला म्हणून तुर्तास एक कोटी रुपये देण्याचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानुसार, एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली. न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (ता. ९) निश्‍चित केली. मध्य रेल्वेतर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com