Mumbai News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे आणि एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल सहा वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीबीआयने दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाबही नोंदवला आहे. हा जबाब प्राथमिक तपासाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. याप्रकरणी अत्याचार आणि हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, या एफआयआरमध्ये नेमके कोणाला आरोपी करण्यात आले आहे ते अद्याप समोर आले नाही.
दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने भा. दं. वि. कलम 302 (हत्या) 376 (सामूहिक अत्याचार), 120 (ब) कट रचणे, 201 (पुरावे नष्ट करणे) तसेच 217 आणि 218 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा काम करत होती. तर, त्यापूर्वीही काही अभिनेत्यांसाठी तिने मॅनेजर म्हणून काम केलं आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूपूर्वी अवघ्या 6 दिवस अगोदर दिशाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी, दिशाने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. तर, दिशाने आत्महत्या केली असून तिच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता.
दिशा सालियन मृत्यू अहवालात नेमके काय ?
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.