Uday Samanat
Uday Samanat  
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'परीक्षा पुन्हा होणार'

सरकारनामा ब्युरो

राज्यभरातील अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूरामुळे (Flood) ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देता आली नाही त्यांच्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ''राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचटीसीईटी (MHT-CET) व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा (CET) पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.'' असे ट्विट करत मंत्री सामंत यांनी प्रवेश परीक्षा पुन्हा घेणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक जिल्ह्यातील गावांचे संपर्क तुटले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा एमएचसीईटी परीक्षा सुरु आहेत. मात्र पावसामुळे मराठवाड्यासह इतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे.

तसेच, प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनीही याबाबत माहिती दिली आहे. मराठवाडा, विदर्भासह इतर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा, त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे जोशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यभरातील मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT