हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातील निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी विरोध केला आहे.
डॉ. नरेंद्र जाधव हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या जवळचे असल्याचा दावा डॉ. दीपक पवार यांनी केला आहे. नरेंद्र जाधव यांची समिती अनावश्यक आहे, वेळकाढूपणाची आहे, त्यामुळे या समिताला आमचा विरोध आहे, असे दीपक पवार यांनी म्हटले आहे.
नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरु होते, त्याआधी ते रिजर्व्ह बॅकेत अधिकारी, अर्थतज्ज्ञ होते. आता ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्ती खासदार आहेत. राष्ट्रपती नियुक्ती खासदारांमध्ये कुणाची नियुक्ती होते, हे सर्वश्रुत आहे. भाजप आणि संघ परिवारासोबत त्यांची जवळीक आहे. खरे तर जाधव यांनी स्वत:हून या समितीचे पद मी घेणार नाही, असे स्पष्टपणे सरकारला सांगायचं होते. कुणाच्या दडपणाखाली त्यांनी हे समितीचे अध्यक्षपद स्वीकारले हे आम्हाला माहीत नाही, असे दीपक पवार यांनी सांगितले.
त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय हा फडणवीस सरकारची एक खेळी आहे, या निर्णयाला अन् समितीला आमचा कडाडून विरोध आहे, असे पवार म्हणाले. कृती समन्वय समितीने त्रिभाषा सक्तीविरोधात पुकारलेले आंदोलन ७ जुलैला आझाद मैदानावर होईल. यावेळी शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करणार असल्याचेही मराठीचे अभ्यासक प्रा. दीपक पवार यांनी सांगितले.
या विरोधासाठीच मुंबईतील आझाद मैदानावर ७ जुलैला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर सरकार त्यांच्याकडून पाहिजे तसा त्रिभाषा सक्तीसंदर्भातील अहवाल तयार करून घेईल, त्यानंतर त्रिभाषा सक्ती करण्यात येईल, असे डॉ. दीपक पवार यांचे म्हणणे आहे.
६ एप्रिल आणि १७ जून रोजीचे शासन निर्णय रद्द झाले, आता १८ जूनचे सुधारित वेळापत्रकही रद्द करा
शिक्षणमंत्री दादा भुसे आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक रेखावार यांनी राजीनामा द्यावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.