Veteran historian Dr Jayasingrao Pawar, known for his deep research on Maratha history, passed away at the age of 85 after illness. Sarkarnama
महाराष्ट्र

Dr. Jaysingrao Pawar : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक काळाच्या पडद्याआड! डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन

Historian Maharashtra Dr. Jaysingrao Pawar Passes Away: डॉ. जयसिंगराव पवार राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला आहे. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं आहे.

Jagdish Patil

Dr. Jayasingrao Pawar passes away : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं गुरूवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास निधन झालं ते 85 वर्षाचे होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरू होते.

याच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योती मालवली. शिवकालीन इतिहासाचा जयसिंगराव पवार यांचा मोठा अभ्यास होता. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.

तसंच ते राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला आहे. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं आहे.

महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25 पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT