Ashok Kharat Case : खरात प्रकरणात नवा स्फोट: फडणवीसांविरोधात आघोरी वार अन् तंत्र-मंत्र?, सपकाळांचा खळबळजनक दावा!

harshwardhan sapkal on Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खळबळजनक खुलासे होत असतानात सरकारवर विरोधक तुटून पडत आहेत. दरम्यान आता या प्रकरणावरून काँग्रेसने मोठे गंभीर आरोप केला आहे.
Ashok Kharat Case; Cm devendra fadnavis, harshwardhan sapkal
Ashok Kharat Case; Cm devendra fadnavis, harshwardhan sapkalsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

  • विजय वडेट्टीवार यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी एन्काऊंटर होण्याची शक्यता व्यक्त केली.

  • हर्षवर्धन सपकाळ यांनी तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा केला.

Mumbai News : नाशिकच्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून काढले असून आता या प्रकरणावरून काँग्रेस महायुती सरकारला घेरताना दिसत आहे. याचप्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा करत या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काऊंटर देखील केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातवर का कारवाई केली याचेही धक्कादायक कारण सांगितले आहे. ज्यात त्यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्या जात होत्या असा दावा केला आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते सरकारवर तुटून पडले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुराव्यांवरून सरकारला घेरत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. यामुळेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच खरातचा एनकाऊंटर देखील केला जाण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली.

Ashok Kharat Case; Cm devendra fadnavis, harshwardhan sapkal
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेंचीही चौकशी होणार? 2022 मधील विखे पाटील, केसरकरांसोबतचा दौरा वादात

आता याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील खळबळ जनक दावे करत भोंदूबाबा अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे उघड झाले आहे. तसेच फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असाही दावा सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये, या भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. पण त्यांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे अशोक खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळत आहे. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना होती तर त्यांनी काही कारवाई का केली नव्हती? असा सवाल केला.

तर त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केली. या तंत्र मंत्र व अघोरी पूजेमुळेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई केलीय. भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आता मित्रपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान सपकाळ यांनी या भोंदू सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो समोर आले असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते असा दावा केला आहेय तर चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Ashok Kharat Case; Cm devendra fadnavis, harshwardhan sapkal
Ashok Kharat Case: रायगड जिल्ह्यात अशोक खरातची जमीन; मुलीच्या नावे केला तब्बल कोटभर रुपयांचा व्यवहार

 FAQs :

1. अशोक खरात प्रकरण काय आहे?
हे प्रकरण गंभीर आरोप आणि राजकीय वादामुळे चर्चेत आले आहे.

2. विजय वडेट्टीवार यांनी काय दावा केला?
पुरावे नष्ट करण्यासाठी एन्काऊंटर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली.

3. हर्षवर्धन सपकाळ यांनी काय आरोप केला?
तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजेचा राजकारणात वापर झाल्याचा दावा केला.

4. या प्रकरणात कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांवर अप्रत्यक्ष आरोप आहेत.

5. पुढे काय घडू शकते?
या प्रकरणावरून मोठा राजकीय संघर्ष आणि तपास तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com