Trigger one for drought declaration in Maharashtra 
महाराष्ट्र

Trigger 1 Drought Calculation : दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरलेले 'ट्रिगर 1' म्हणजे काय? तुमचा फायदा होणार की नुकसान? 5 मिनिटांत समजून घ्या संपूर्ण गणित!

Drought relief benefits for farmers Maharashtra : महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर एक’ कसा ठरवला जातो? त्याचे निकष, गणित आणि शेतकऱ्यांना होणारा परिणाम सोप्या भाषेत जाणून घ्या.

Rashmi Mane

महाराष्ट्रात यंदा पावसात मोठे खंड पडल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिकांची वाढ अडचणीत आली असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार परिस्थितीचे मूल्यांकन केले. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित भागात दुष्काळी उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘Trigger-1’ म्हणजे नेमकं काय?

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने काही निश्चित निकष ठरवले आहेत. त्यानुसार दुष्काळी परिस्थिती ओळखण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांचा वापर केला जातो. त्यातील पहिला टप्पा म्हणजे ‘Trigger-1’.

एखाद्या भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली किंवा पावसामध्ये दीर्घ खंड पडला, तर त्या भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे का, हे तपासले जाते. विशेषतः जून आणि जुलै महिन्यातील पाऊस 50 टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास हा महत्त्वाचा निकष ठरतो. कारण याच काळात खरीप पिकांची पेरणी केली जाते. पाऊस कमी असल्यास पिकांच्या उगवणीवर आणि वाढीवर थेट परिणाम होण्याची शक्यता असते.

तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत 85 टक्के किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाल्यास त्याचाही विचार दुष्काळी परिस्थितीच्या मूल्यांकनात केला जातो.

1 जून ते 30 सप्टेंबरचा पाऊसही महत्त्वाचा

संपूर्ण पावसाळ्याचा कालावधी म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या काळातील पर्जन्यमानही तपासले जाते. या कालावधीत सरासरीच्या 75 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाल्यास तो ‘Trigger-1’ मधील महत्त्वाचा निकष मानला जाऊ शकतो.

यानंतर ‘Trigger-2’ अंतर्गत परिस्थितीचे आणखी सखोल मूल्यांकन केले जाते. यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांची स्थिती, वनस्पतींची वाढ, पिकांचे आरोग्य आणि उपलब्ध भूजल यासारख्या घटकांचा अभ्यास केला जातो.

शेतकऱ्यांना फायदा काय?

दुष्काळी परिस्थिती अधिकृतपणे निश्चित झाल्यानंतर संबंधित भागांसाठी सरकारकडून ठराविक सवलती आणि उपाययोजना लागू केल्या जातात.

दरम्यान, सरकारने काढलेल्या GR मध्ये सध्या तरी शेतकऱ्यांना १२ सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ट्रिगर-१ हा दुष्काळाची परिस्थिती ओळखून तातडीच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्यासाठीचा महत्त्वाचा पहिला टप्पा आहे.  अंतिम मदत आणि सवलतींसाठी संबंधित नियम, पुढील मूल्यांकन आणि शासनाचे निर्णय महत्त्वाचे ठरतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT