Maharashtra Drought : रत्नागिरीला दिलासा! दुष्काळाच्या छायेतील तीन तालुक्यांचा समावेश; 10 मोठे लाभही मिळणार

Ratnagiri Drought Affected Talukas : महाराष्ट्रातील Trigger 1 लागू झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून याबाबत आज शासन निर्णय निघाला असून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे.
Ratnagiri Drought; Cm Devendra Fadnavis
Ratnagiri Drought; Cm Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून Trigger 1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर याबाबत (ता.२६) शासन निर्णया जारी करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून यातील कोकणातील पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर जिल्हा निरंक ठरला असून जिल्ह्यातील एकही तालुक्याचा यात समावेश नाही. तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा या यादीत समावेश आहे. या निर्णयामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात खरीप हंगाम मोठ्या संकटात आहे. यावरून शेतकरी मदतीची मागणी सरकारकडे करत आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेत 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांचा समावेश झाला आहे. तसेच या तालुक्यांत विविध सवलती आणि उपाययोजना देखील लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान रत्नागिरी जिल्हा कृषी विभागालाही प्राथमिक चाचपणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्हा कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यामध्ये रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने हे तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. जिल्ह्यात सध्या भातपिकाचे २० टक्के नुकसान झाल्याचे चित्र असून आणखी १० दिवस पाऊस झाला नाही तर ते हे नुकसान ३० ते ४० टक्यांवर जाण्याची चिंता कृषी विभागाने व्यक्त केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

Ratnagiri Drought; Cm Devendra Fadnavis
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या GR ची अवघ्या तासाभरात चिरफाड! फडणवीस सरकाविरोधात लगेचच आंदोलनाचीही घोषणा

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा मोठ्या संकटात आहे. जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर भातपीक असून, प्रतिहेक्टर ३५६ किलो एवढे उत्पादन आहे. मात्र लातूर, धाराशिव, सोलापूर आदी भागात पाऊस न आल्याने आलेले पीक डोळ्यासमोर करपत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही भातशेती अशीच डोळ्यासमोर करपणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्याची दाहकता रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळत आहे. या तालुक्यांमध्ये ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

हा वरकस भाग म्हणजे कातळाचा भाग असल्याने पिकाला प्रचंड ओढ लागली आहे. या तालुक्यातील पीक आणखी आठ ते दहा दिवस पाऊस पडला नाही तर हातातून जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. थेट नैसर्गिक आपत्ती नसली तरी पिकांची ही स्थिती गंभीर आहे. पिकाचे शेंडे करपत आहेत. हळव्या भाताचे तर जास्त नुकसान होत आहे.

यामुळे शासनाने जिल्हा कृषी विभागाला प्राथमिक चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाने आपले काम सुरू केले आहे; मात्र या परिस्थितीमुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. भातपिकाला पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

'अशा' मिळणार विविध सवलती आणि उपाययोजना

1. जमीन महसुलात सूट

2. पिक कर्जाचे पुनर्गठन

3. शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती

4. कृषी पंपांच्या वीज बिलात सूट

5. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

Ratnagiri Drought; Cm Devendra Fadnavis
Maharashtra Drought 2026: दुष्काळ जाहीर, आता मदत कधी? पंचनामा ते GPS सर्वेक्षण; GR मध्ये सगळं स्पष्ट

'अशा' मिळणार विविध सवलती आणि उपाययोजना

6. रोजगार हमीची अधिक कामे सुरू करणे

7. आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर

8. कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे

9. शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची व्यवस्था

10. जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता

11. जलसंधारणाची कामे सुरू करणे

12. पिण्याचे व जनावरांच्या पाण्याचे नियोजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com