Aryan Khan
Aryan Khan sarkarnama
महाराष्ट्र

आर्यन खानची NCBकडे विनंती ; चूक सुधारण्याची संधी द्या!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई : अभिनेता शाहरूख खान व डिझायनर गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अंमली पदार्थ विरोधी विभाग अर्थात एनसीबीने (ncb) अटक केलेली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अटक केलेली आहे. त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. एनसीबीच्या कोठडीत आर्यन खान (कैीदी क्रमांक N956) असताना त्याचे समुपदेशन अर्थात काऊन्सिलिंग करण्यात आले आहे. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक केलेल्या आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह सर्व आरोपींच्या एनसीबी कोठडी दरम्यान, इस्कॉन मंदिराचे पुजारी आणि मुंबईचे मौलाना यांच्या मदतीने सर्व समुपदेशन केले गेले. यावेळी आर्यन खानने चुकीची कबूली दिली. मला चूक सुधारण्याची एक संधी द्या, अशी विनंतीही आर्यनने NCB अधिकाऱ्यांकडे केली आहे.

5 दिवसांच्या कोठडी दरम्यान, दिवसाचे 2-3 तास समुपदेशन केले जात होते, सर्व तरुणांना ड्रग्सचे वाईट आणि त्याचे शारीरिक आणि कौटुंबिक परिणाम समजावून सांगण्यात आले. समुपदेशनावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे उपस्थित होते. कोठडी दरम्यान, आर्यन खानसह मुस्लिम आरोपींना कुराण आणि इतर आरोपींना वाचण्यासाठी भगवतगीता आणि बायबलच्या प्रती देण्यात आल्या.

समुपदेशनादरम्यान आर्यन खानने समीर वानखेडे या़ना वांद्रेच्या आसपासच्या झोपडपट्टीत राहणा -या गरीबांना मदत करण्याचे आश्वासन दिले. वानखेडेने आर्यनला बेलनंतर त्याच्या समाजासाठी चांगल्या कामाचे फोटो शेअर करण्यास सांगितले.

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनीही आर्यन खानचं समुपदेशन केलं. ''आपल्याला समाजातील गरिबांसाठी काम करायचं आहे,'' असे आर्यन खान म्हणाला. ''भविष्यात चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुम्हाला अभिमान वाटेल, असं काम भविष्यात करेन,'' असं आर्यन समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना म्हणाला.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली असून, त्याच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आर्यनच्या जामीनावर २० ऑक्टोबर रोजी निकाल दिला जाणार आहे. ''बाहेर पडल्यानंतर एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन,'' असं आर्यन खान या काऊन्सिलिंगवेळी म्हणाला.

क्रूझ ड्रग्स (Drugs party) पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा (Aryan Khan) तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारी झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीनंतर विषेश न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी २० ऑक्टोबरपर्यंत हा निकाल राखून ठेवला आहे. एनसीबीने आर्यनला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते आणि चौकशीनंतर अटक केली होती. तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT