अजितदादा आता चिडले...भाजपसोबत जाण्यास नकार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (ncp) बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याची माहिती भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन Girish Mahajanयांनी दिली. त्यामुळे खळबळ उडाली
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

जळगाव : ''वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजप सोबत जाणार नाही,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना व्यक्त केले. जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank) निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह सर्व पक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते .जागा वाटप निश्चित करण्यात आले होते.

काँग्रेस पक्षाने घुमजाव करीत भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याने त्या सोबत वरिष्ठांनी जाण्यास नकार दिल्याचे सांगत सर्व पक्षीय पॅनल मधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी,शिवसेना व भाजप असे तीनपक्षाचे पॅनल होण्याची शक्यता होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याची माहिती भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन Girish Mahajanयांनी दिली. त्यामुळे खळबळ उडाली

Ajit Pawar
कमी प्रतीचा गांजा मारल्यामुळेच या कल्पना सुचतात ! फडणवीस-पाटलांना टोमणा

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पक्ष्याचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा बँक निवडणुकित भाजप सोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वपक्षीय पॅनल मधून बाहेर पडली आहे. आता शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी पॅनल होईल. एकनाथ खडसे. सध्या मुंबईत आहेत ते जळगावात आल्यानंतर त्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा खडसे मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सोबत जाण्यास आता नकार दिल्याने आता भाजप स्वतंत्र लढणार आहे.त्या मुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे सासरा विरूद्ध सून अशी लढत होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते मात्र काँग्रेस पक्षाने भाजप सोबत जाण्यास नकार दिला होता.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे असे भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

''पक्षाचा आदेश असल्याने आपण जिल्हा बँक संचालक निवडणुकीत उतरणार आहे असे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले,त्या म्हणाल्या सर्व पक्षीय पॅनल साठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्याला यश येत नाही त्यामुळे आपल्या पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन आपल्याला लढण्याचा आदेश दिल्यास आपण निवडणूक लढविणार आहोत,'' असे रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com