Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेली आहे. मात्र, या पराभवानंतरही शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटात वाद सुरूच आहे. दोघेही एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे नेहमीच छोट्या-मोठ्या विधानावरून एकमेकांना प्रत्त्युत्तर दिले जाते.
कोणाच्या पापाचा घडा भरला आहे हे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विधानसभेत दिसेल. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचा काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल. जनता काम करण्याच्या पाठीशी उभी राहील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. (Eknath Shinde News)
छत्रपती संभाजीनगर येथील मार्गदर्शन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर सडकून टीका करताना पापाचा घडा भरला आहे, अशी टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले. लोकसभा निवडणुकीत 13 जागा आम्ही लढलो आणि सात जागा जिंकल्या. ठाकरेंच्या तुलनेत दोन लाख मत आम्ही जास्त घेतली आहेत. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 42 टक्के स्ट्राईक रेट होता, तर आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी शिवसेनेचा (Shivsena) मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे, याची प्रचिती तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली आहे. अभद्र युती केली याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागेल, असेही ते म्हणाले. \
यापूर्वीच्या काळात कधीच स्वतःच्या गेट बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहेत, याचा आनंद आम्हाला होत आहे, असा चिमटा देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला. महिला भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत. आम्ही त्या लाडली पण योजनेतील अटी कमी केल्या. तीन सिलेंडर मोफत देत आहोत, या योजना येत्या काळात महिलांमध्ये लोकप्रिय ठरतील, असा विश्वास यावेळी शिंदेनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे, ती कायमस्वरूपी राहणार आहे. त्यासोबतच नियमित कर्ज भरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे. त्याचे पैसे आम्ही देत आहोत. त्यांच्या काळात विज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या. त्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक आहे, असे आम्ही करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.