BJP Maharashtra latest updates: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप परतीच्या चर्चा सुरू आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांची भेट झाल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसेंभोवती सुरू असलेल्या या चर्चांमध्ये भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान करत, चर्चांना अधिक गरम केल्या आहेत.
तसेच जुन्या विधानाची आठवण करून दिली. जेव्हा पक्षाकडे काही नव्हते, तेव्हा काहींनी पक्षासाठी काम केलं. त्यातील एकनाथ खडसेसाहेब एक आहे. पक्ष मोठा होत असताना, जुन्यांनी, घरच्यांनी बाहेर जाणे योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, "भाजप पक्ष वाढण्यात गेल्या 40 वर्षांत अनेकांचे योगदान आहे. त्यातील एक एकनाथ खडसे आहे. कामाच्या ओघात चुका झाल्या असतील. यावर अमित शाह यांनी काही चर्चा केल्या असतील, तर मला त्याची कल्पना नाही. कामाच्या ओघात काही घटना घडल्या असतील अन् ते पक्षाबाहेर गेले असतील."
भाजप (BJP) पक्षाकडे काही नव्हते, तेव्हा पक्ष वाढीसाठी एकनाथ खडसे यांनी जीव लावून काम केले. ते बाहेर गेले तेव्हा मी म्हटलं होतं की, पक्ष वाढेल मोठा होईल. पण घरचे लोक बाहेर जाणं काही योग्य नाही, असे म्हटलं होते, या जुन्या विधानाची आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी, राज्याचे सर्वाधिक मुख्यमंत्री होण्याचा विक्रमावर, सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांवर, ते अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावेत, अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या.
भाजप पक्ष विस्तारासाठी आखण्यात येणाऱ्या रणनीतीवर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री आठ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही या कोअर कमिटी बैठकीला हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे यांची भेट अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. याचे आमंत्रण देण्याची ही अपौचारिक भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट करत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. परंतु आगामी काळात राजकीय काय उलथापालथी होतील, याकडे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.