Talathi Attacks Anchor : 'माझे नाव माईकवर का घेतले नाही?' म्हणत तलाठ्याचा हल्ला; विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालक गंभीर जखमी

Talathi booked after allegedly attacking wedding anchor with iron-rod microphone over name announcement dispute : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील घटना; नाव न पुकारल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप, जखमीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा
Talathi Attacks Anchor : 'माझे नाव माईकवर का घेतले नाही?' म्हणत तलाठ्याचा हल्ला; विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालक गंभीर जखमी
Published on
Updated on

Ahilyanagar News : विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात नाव न घेतल्याच्या रागातून तलाठ्याने सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड असलेला माईक मारल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे घडली.

या हल्ल्यात सूत्रसंचालक गंभीर जखमी झाला असून, जखमीच्या फिर्यादीवरून संबंधित तलाठ्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अशोक रामचंद्र पठाडे (वय 37, रा. जवळा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शनिवारी (11 जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात ते सूत्रसंचालन करत होते.

फिर्यादीनुसार, त्याच गावातील तलाठी (Talathi) शिवाजी सखाराम हजारे हे तेथे आले आणि "माझे नाव माईकवर का पुकारले नाही?" असा जाब विचारत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून अशोक पठाडे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Talathi Attacks Anchor : 'माझे नाव माईकवर का घेतले नाही?' म्हणत तलाठ्याचा हल्ला; विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालक गंभीर जखमी
Marriage extortion case : लग्नासाठी मुलगी दाखवण्याचा सापळा! तरुणाला घरात डांबून खंडणी उकळली; तीन महिलांना अटक

या हल्ल्यात अशोक पठाडे गंभीर जखमी झाले. तसेच आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Talathi Attacks Anchor : 'माझे नाव माईकवर का घेतले नाही?' म्हणत तलाठ्याचा हल्ला; विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालक गंभीर जखमी
PM Modi RuPay UPI Payment : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यात पेमेंट कसे करतात? जाणून घ्या रंजक गोष्ट अन् रणनीती?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या जीवन रोडे, तानाजी पवार आणि प्रशांत पवार यांनी मध्यस्थी करून वाद थांबवला. त्यानंतर प्रशांत शिंदे यांनी जखमी अशोक पठाडे यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमी अशोक पठाडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी तुकाराम सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com