Eknath Khadse Fraud Case Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Khadse Video : महार वतनाची जमीन हडपली, एकनाथ खडसे अडचणीत; स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाले 'मी...'

Eknath Khadse Mahar Watan Land Case : एकनाथ खडसे यांच्या विरोधात महार वतनाची जमीन हडपल्या प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर या प्रकरणात खडसेंनी आपली भूमिका मांडली आहे.

Roshan More

Eknath Khadse News : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची अडचण वाढली आहे. महिलेची फसवणूक करत महार वतनाची जमीन हडपल्या प्रकरणी त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. खडसेंसोबत त्यांच्या लेकीवर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'मी 2002 ला जमीन खरेदी केली होती. जी जमीन खरेदी केली होती ती वर्ग एकची जमीन होती. ती महार वतनाची जमीन नव्हती. वर्ग एकची जमीन आहे ती कोणीही खरेदी करू शकते.'

'पैसे देण्याचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही 2002 लाच जेव्हा जमीन खरेदी केली होती तेव्हाच रेडी रेकरनच्या दराने पैसे दिले होते. साखर कारखान्यासाठी हा जमीन खरेदीचा प्रकरण आहे. 2002 मध्ये ही 85 एकर जमीन खरेदी केली होती. 29 लोकांनी खरेदी करून दिली होती.', असे देखील त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, '2002 ते 2026 पर्यंत याबाबात कोणीही तक्रार केली नाही. आज अचानक 5 एकर, 6 एकर जमीन महारवतन जमीन आहे असे म्हणत तक्रार केली गेली. राजकारणाने प्रेरित होऊन या गोष्टी केल्या जात आहे.'

पोलिसांवरही दबाव

जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाला कोणी विरोध करत नाही. मी एकटाच असा आहे जो उघडपणे विरोध करतो. त्यामुळे दबाव टाकण्यासाठी, मला अडकवण्यासाठी, आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे. या प्रकरणात पोलिस देखील दबावात आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलिस हे ज्यांची सत्ता त्यांच्या बाजुने असतात, असा आरोप देखील त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT