Eknath Khadse Fraud Case : खडसे बापलेकी अडचणीत! कारखाना उभारणीच्या बहाण्याने 82 वर्षीय महिलेची फसवणूक, गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

A fraud case has been registered against NCP Sharad Pawar faction MLA Eknath Khadse and his daughter Sharda Khadse over alleged land deal irregularities in Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखला झाला आहे.
Eknath Khadse Fraud Case
Eknath Khadse Fraud CaseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon land deal fraud : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चमेलाबाई तुकाराम तायडे (वय 82) यांनी आपली जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

एकनाथ खडसेंबरोबर त्यांची कन्या शारदा खडसे, दुय्यम निंबधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि दस्तावर खाडाखोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसे बापलेकीविरोधात फसवणुकीबरोबर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड भुसावळ तालुक्यातील मानपूर इथलं हे जमीन खरेदी-विक्री प्रकरण आहे. यात फसवणूक झाल्याची तक्रार 82 वर्षाच्या महिलेनं दिली होती. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी महसूल प्रशासनाकडे तपासणी करत, हा गुन्हा दाखल झाला.

भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमिनी 2002 साली साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली विकत घेण्यात आल्या होत्या. यात गट क्रमांक 122 ही महार वतनाची जमीन मानपूर इथल्या शेतकऱ्याला आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना कुटुंबाला जमिनाचा चांगला मोबदला, कुटुंबातील सदस्यांना नियोजित तापी-पूर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

Eknath Khadse Fraud Case
Divyang Scam : धक्कादायक! बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा स्फोट; 11 गुन्हे, 5247 लाभार्थ्यांकडील UDID-KYC गायब

यासाठी कुटुंबाला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून अगावू 51 हजार रूपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदांवर अंगठे घेऊन बोदवड इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी करण्यात आली. यानंतर उर्वरित पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील, या कुटुंबाला जमिनीचा मोबदला मिळाला नाही, असेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

Eknath Khadse Fraud Case
Rupali Chakankar SIT summons : पुरावे नष्ट होण्याआधीच अटक करा! रोहिणी खडसेंचा थेट इशारा; चाकणकरांच्या अडचणीत भर

महसूल विभागाकडे चौकशी

उपअधीक्षक अशोक नखाते यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. या जमिनीसंदर्भात 82 वर्षाच्या महिला फिर्यादीनं 9 मार्च तक्रार दिली होती. त्यांची जमीन 2002 मध्ये विकत घेऊन, कारखान्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले गेले होते. या जमिनीच्या मोबदल्यात काही आश्वासन दिले होते. पण कार्यवाही न झाली नाही, असे तक्रार केली.

जळगाव आर्थिक शाखेकडून शहानिशा

या तक्रारीच्या अनुषंगाने जळगाव आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी कागदपत्रांची महसूल विभागाकडे तपासणी केली. त्यात खाडाखोड आढळली. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाचा अहवाल देखील मागितला. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या स्तरावर काही निष्पन्न होत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचं सुचवलं.

या कलमांनुसार दाखल झालाय गुन्हा

फिर्यादीची रीतसर तक्रार घेऊन काल गुन्हा दाखल झाला. पण फिर्यादीने तक्रारीत ही जमीन महार वतनाची आहे, असा कोणताही उल्लेख केलेला नाही, असे उपअधीक्षक नखाते यांनी स्पष्ट केलं.  एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, मध्यस्थ इसम सुधाकर निनू पाटील तसेच बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर बीएनएस 2023चे कलम 311 (4); 31, 6 (2); 336 (2); 336 (3); 340, 3 (3) या कलमांसह अनुसुचीत जाती-जमाती प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3 (1) (F); 3 (1) (G) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जमीन शारदा खडसेंच्या नावावर...

दुसरीकडे, अनेक वर्षे उलटूनही संबंधित जागेवर सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला नाही. दरम्यान, 2025मध्ये तायडे कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी केली असता, सदर जमीन शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर नोंद झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे धक्कादायक स्थिती निर्माण झाली. यानंतर तायडे कुटुंबाने प्राथमिक पडताळणी केली असता जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com