Eknath Khadse, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाचे काय झाले? एकनाथ खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला

Roshan More

Eknath Khadse News : भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार याची चर्चा सुरू आहे. गणपती विसर्जनानंतर वरिष्ठांशी चर्चा करून खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, गणेशविसर्जन होऊन पाच दिवस झाले तरी खडसेंच्या भाजप प्रवेशावर कोणताही निर्णय झालेला नाही.

गणेशविसर्जनानंतर देखील पक्षप्रवेश झाल नसल्याने एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले, 'गणेशविसर्जनासोबत भाजपमधील प्रवेशाचे देखील विसर्जन झाले आहे.'

खडसेंच्या या प्रतिक्रियेमुळे खडसे यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याची चर्चा आहे. खडसे यांनी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. आपण भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून केंद्रातून प्रयत्न करण्यात आले. मात्र, पुढे काहीच झाले नसल्याचे खडसे म्हणाले होते.

अमित शाह यांच्या बैठकीला उपस्थिती?

अमित शाह हे विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात खडसे यांना निमंत्रण असल्याचे चर्चा होत्या. मात्र, खडसेंना निमंत्रण नसल्याचे भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, अमित शाह यांच्या दौऱ्यात पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अनेक नेते पदाधिकारी नाहीत. त्यांना देखील निमंत्रण नाही. खडसे यांनाही निमंत्रण नाही.

शरद पवार गटात सक्रिय होणार?

लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. आता भाजपमध्ये प्रवेशाचे विसर्जन झाले आहे, असे म्हणत भाजपमध्ये जाणार नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे पुन्हा शरद पवार गटात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT