Gulabrao Patil : शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याने जाहीर सभेत सांगून टाकलं

Gulabrao Patil Sharad Pawar Uddhav Thackeray : कार्यकर्त्यांना सल्ला देत गुलाबराव पाटील म्हणाले, तू ग्रामपंचायतीला निवडून येत नाही आणि शरद पवारसाहेबांवर टीका करतो. आपली लायकी पाहा. ग्रामपंचायतीमध्ये मतपेटी भरून दाखव आपली किंमत आपोआप होईल.
Sharad Pawar, Uddhav thackeray
Sharad Pawar, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News: आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीच बोलू नका. शरद पवारसाहेबांवर टीका करू नका. ती आपली लायकी नाही. आपली लायकी कोण? संजय राऊत. आपला माल आहे तो. मी उद्धव ठाकरेंवर कधीच मी टीका करत नाही. माझी ती लायकी नाहीये. शिंदे साहेब बघतील ते, देवेंद्रजी बोलतील, असे जाहीर कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले

गुलाबराव पाटील म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्या येवढा मोठा मी झालो नाही. मी माझ्या लेवलच्या माणसावर टीका केली पाहिजे, असा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे.

कार्यकर्त्यांना सल्ला देत गुलाबराव पाटील म्हणाले, तू ग्रामपंचायतीला निवडून येत नाही आणि शरद पवारसाहेबांवर टीका करतो. आपली लायकी पाहा. ग्रामपंचायतीमध्ये मतपेटी भरून दाखव आपली किंमत आपोआप होईल.

माझी हात जोडून विनंती आहे. फक्त 52 दिवस राहिले आहेत. 181 गावं, दोन महापालिका आहेत. भाजपवाल्यांशी नीट बोला. ते नवरदेववाले आहेत. आपण नवरीवाले आहोत. लोकसभेला ते नवरीवाले होते. लोकसभेला आपण प्रामाणिकपणे त्यांचे काम केले.

Sharad Pawar, Uddhav thackeray
Supriya Sule News : राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

जळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. विरोधकांनी मला आव्हान केलं होते की मी गद्दार आहे. मी त्यावेळी विधानसभेत सांगितले होते मी आम्ही गद्दारी केली नाही उठाव केलाय उठाव. एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता तर आज जी करोडो रुपयांची कामं झाली आहेत ती झाली नसती, असा दावा देखील गुलाबराव पाटील यांनी केला.

संजय राऊतने आव्हान दिले होते की जे 40 जण फुटले त्यांच्या विरोधात आम्ही शिवसैनिक उभे करू. मी विचारतोय कुठेय ते शिवसैनिक. हे सगळे पळपुटे आहेत. यांना आयात केलेला माणूस आणावा लागेल आणि हीच आमच्या विजयाची पहिली घंटा असेल, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

Sharad Pawar, Uddhav thackeray
Dhananjay Chandrachud : आमदार अपात्रता सुनावणीच्या एक दिवस आधी सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com