Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Padharpur Wari : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार 20 हजार रुपयांची देणगी

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Ashadhi Wari News : राज्यात पंढरपूर आषाढी वारी दोन आठवड्यांत निघणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 28 जून तर माऊलींच्या पालखीचे 29 जून रोजी प्रस्थान होणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या आषाढी वारीसाठी मोठी घोषणा केली आहे.

वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपायांची देणगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या वतीने घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पंढरपूर वारीतील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत राज्यभरातील वारकरी सांप्रदाय सहभागी होतो. या पालखीत अधिकृतपणे दीड हजार दिंड्या असतात. या प्रत्येक दिंडीला आता राज्य सरकारच्या वतीने 20 हजार रूपयांची देणगी देण्यात येणार आहे. या देणगीचा फायदा राज्यातील शेतकरी असलेल्या वारकऱ्यांना पालखीदरम्यान होणार आहे. यासाठी व्यसनमुक्ती खात्याकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आषाढी वारीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने व्यसनमुक्ती दिंडीच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला जातो. विठुनामाच्या गजरात व्यसनमुक्ती व अंद्धश्रद्धा निर्मूलनाचे मोठे सामाजिक कार्य या दिंडीतून करण्यावर सरकारचा भर असतो. यातून वारीतील दिंड्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी होत होती. त्यास विरोधकांचाही पाठिंबा आहे.

आता व्यसन मुक्ती खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याकडेच आहे. त्यांच्या माध्यमातून आता दोन्ही पालखीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपयांची देणगी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT