Satara NCP SP Dispute : किल्ला गेला तरी धुसफूस कायम; साताऱ्यातील शरद पवार गटात चाललंय तरी काय?

Shrinivas Patil, Shashikant Shinde : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळाव्याचे शनिवारी पाटणला आमदार शिंदेच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Karad Political News : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार यांचा बालेकिल्ला होता. आता साताऱ्याच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्यात भाजपला यश आले आहे. एकीकडे पराभवाला समोरे जावे लागले तरी दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाअंतर्गत धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे. पाटणला शनिवारी पक्षाचा आभार मेळावा असून त्यासाठी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून इच्छुकांची संख्या वाढली होती. त्यासाठी येथून आमच्या पक्षाला मिळावे, यासाठी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावलेली होती. साताऱ्याचे तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पक्षाच्या फाटाफुटीत यावेळचे तिकीट त्यांना मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत मजल मारण्याची संधी मिळेल, अशी स्थिती होती.

खासदार पाटील यांनी तब्बल तीन वेळा खासदार आणि सहा वर्षे सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्यामुळे प्रशासनातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्याचबरोबर सारंग पाटील यांनीही खासदारांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांतून गावांगावात संपर्क वाढवला होता. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी खासदार पवार गटाची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला.

Sharad Pawar
Navneet Rana : मी हारूनही जिंकले! नवनीत राणा असं का म्हणाल्या...

आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे तर माजी मंत्री पाटणकर यांनी त्यांचे पुत्र सत्यजीतसिंह पाटणकर यांचे नाव पुढे केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटापुढे उमेदवारी कोणाला द्यायची यावरून मोठा पेच निर्माण झाला. अशा स्थितीत सातारा राखण्याच्या दृष्टीने उमेदवार देणे हे शरद पवार यांच्यापुढे आव्हान होते. त्यातून त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देवून मध्य साधण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेत साताऱ्याचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसला राखता आला नाही. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या पक्षाचा खासदार उदयनराजे भोसले यांच्या रुपाने निवडून आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळाव्याचे शनिवारी पाटणला आमदार शिंदेच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजीतसिंह पाटणकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद उर्फ भानुप्रताप कदम, प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मात्र पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीतील पराजयानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत धुसफूस कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Nilesh Lanke : नीलेश लंकेसाहब, 'यह पब्लिक है, सब जानती है'; गज्या मारणेच्या भेटीवर बनावाबनवी का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com