Eknath Shinde appoints Anand Paranjpe as Shiv Sena spokesperson Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde: दसरा मेळाव्याआधीच शिंदेंचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीतून आलेल्या माजी खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Eknath Shinde appoints Anand Paranjpe as Shiv Sena spokesperson: एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेनेतील पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत आनंद परांजपे प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Mangesh Mahale

Mumbai News: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काही तास शिल्लक असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेच्या पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार आनंद परांजपे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी परांजपे यांच्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेनेतील पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत आनंद परांजपे प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाकडून या नियुक्तीची माहिती देण्यात आली.

आनंद परांजपे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार असलेल्या परांजपे यांना पक्षात प्रवेशानंतर लगेचच प्रवक्तेपदाची जबाबदारी मिळाल्याने या नियुक्तीकडे लक्ष वेधले जात आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोध केल्याची चर्चा सूत्रांच्या हवाल्याने समोर आली होती.

गोरेगावमधील मेळाव्याकडे राज्याचे लक्ष

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शिंदे आपल्या भाषणातून कोणते मुद्दे मांडणार, याबाबत उत्सुकता आहे. राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांसाठी काही मोठी मदत जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यांकडेही लक्ष

यंदाच्या दसरा मेळाव्यांना राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होतआहे. त्यामुळे गोरेगावमधील मेळाव्यात एकनाथ शिंदे कोणत्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य करतात, याकडे लक्ष असेल.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि त्यांच्या भाषणातून कोणते राजकीय संदेश दिले जाणार, याबाबतही उत्सुकता आहे. दोन्ही मेळाव्यांतील भाषणांमधून राज्यातील राजकीय संघर्षाचे कोणते चित्र समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT