Mumbai News : शिवसेनेच्या इतिहासात 21 जून 2022 साली एकनाथ शिंदेंनी बंड करीत मोठा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत शिवसेनेचे 40 आमदार व 13 खासदार सोबत घेत बंड केले होते. या घटनेला चार वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांचा गट एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना या निमित्ताने शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड कोणते? याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात अनेकवेळा बंड झाले. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शिवसेनेला सहन करावा लागला आहे. शिवसेना सोडून बंडखोरी करणारा पुन्हा निवडून येत नव्हता, हा इतिहास खरा आहे. त्यातच निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही काही जण राजकारणात पुन्हा यशस्वी झाले आहेत. तर दुसरीकडे 60 वर्षांच्या शिवसेनेच्या इतिहासात एकाचवेळी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार व 13 खासदार 22 जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. एकनाथ शिंदे यांनी केलेले 60 वर्षांच्या शिवसेनेच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड ठरले आहे. गेल्या तीन बंडामध्ये 10 पेक्षा जास्त आमदार कधीही वेगळे झाले नाहीत.
साधारण चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या जवळपास शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार व 13 खासदार अशी सर्व दिग्ग्ज मंडळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले होते. त्यावेळेस राज्य सरकारमध्ये जवळपास 20 आमदारांना मंत्रिपद व महामंडळे मिळाली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही जणांना फटका बसला. सोडून गेलेल्या 13 खासदारापैकी सहा जणच पुन्हा निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या वाढली. 50 आमदार सोडून गेले होते 56 आमदार निवडून आले.
21 जून 2022 साली शिवसेनेला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत शिवसेनेचे 40 आमदार व 13 खासदार सोबत घेत बंड केले. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड आहे. आतापर्यंतची एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द पाहता एकनाथ शिंदे यांना बंड पचनी पडल्याचे दिसत आहे. त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह देखील उद्धव ठाकरेंकडून हिसकावून घेतले आहे. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना भाजपच्या (Bjp ) मदतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह देखील उद्धव ठाकरेंकडून हिसकावून घेतला आहे. हा वाद सध्या सुप्रिम कोर्टात असून त्यावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.