Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv Lokhande : ‘दुसऱ्यांदा ठाकरेंना दगा?’ भाऊसाहेब वाकचौरे शिंदे शिवसेनेत? आता सदाशिव लोखंडेंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

Bhausaheb Wakchaure likely join Eknath Shinde camp amid Operation Tiger, raising big questions over Sadashiv Lokhande political future Shirdi : शिर्डीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, शिवसेना ठाकरे पक्षातील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच, तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुनर्वसनाची चर्चा सुरू
Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv Lokhande
Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv LokhandeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Lok Sabha Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना ठाकरे पक्षातून फुटून तयार होत असलेल्या स्वतंत्र गटात सहभागी झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा गट पुढे एकनाथ शिंदे शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती समोर येत असून, यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अचानक बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो माजी खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या राजकीय भवितव्याचा. कारण शिवसेना फुटीनंतर लोखंडे यांनी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. मात्र आता वाकचौरे शिंदे गटात दाखल झाल्यास, 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, भविष्यात लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन झाल्यास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दोन्ही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी मिळू शकते. पण तोपर्यंत सदाशिव लोखंडे यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार आहे.

Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv Lokhande
Bhausaheb Wakchaure Wife Reaction : दिल्लीत काय चाललंय? भाऊसाहेब वाकचौरे गायब? पत्नी म्हणाल्या… सकाळपासून संपर्क नाही

विशेष म्हणजे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप दुसऱ्यांदा होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा साईबाबांची शपथ घेतल्यानंतरही स्वतंत्र गटात सहभागी झाल्याची चर्चा रंगली आहे.

Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv Lokhande
Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे ‘यूबीटी’त राहणार की 'NDA'त जाणार? सुजय विखेंकडून ‘स्वागता’चे संकेत

शिवसैनिकांचा वाकचौरेंवर रोष

शिवसेना फुटीनंतर 2022 मध्ये सदाशिव लोखंडे यांनी शिंदे यांची साथ दिली होती. त्यानंतर 2024 मध्ये संधी साधत वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे घरवापसी केली. त्यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी वाकचौरे यांना उमेदवारी देऊ नये, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विरोध डावलत त्यांच्यावर विश्वास दाखवला.

थोरातांचे मविआला 2024मध्ये मिळाले बळ

2024 च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. मात्र त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची स्पष्ट हवा होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यात पूर्ण ताकद लावत दोन्ही मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का दिला होता.

वाकचौरेंना लोखंडे भारी?

वाकचौरे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास सातत्याने पक्षांतराचा इतिहास दिसतो. 2009 मध्ये त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. 2014 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला, श्रीरामपूर विधानसभा लढवली, पराभूत झाले. 2019 मध्ये भाजपमधून हकालपट्टीनंतर अपक्ष निवडणूक लढवली आणि पुन्हा सदाशिव लोखंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

शिंदे शिवसेनेत वाकचौरेविरुद्ध लोखंडे संघर्ष

त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा शिवसेना ठाकरे पक्षात परतत लोकसभा जिंकली. पण आता पुन्हा स्वतंत्र गटाच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. तसे झाल्यास शिर्डीतील पुढील राजकारण केवळ वाकचौरे विरुद्ध ठाकरे इतके मर्यादित राहणार नाही, तर शिंदे शिवसेनेत वाकचौरे विरुद्ध लोखंडे असा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

2029 मध्ये उमेदवार कोण?

एकूणच, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता सर्वात मोठा प्रश्न एकच आहे. 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? आणि याच चर्चेने राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाची बीजे रोवली आहेत. राजकीय परंपरा अशी राहिली आहे की, विद्यमान खासदाराला पुढे निवडणुकीचे तिकिट मिळते. तोच कित्ता शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाल्यास, सदाशिव लोखंडे यांच्यासमोर राजकीय पुनर्वसनाचे आव्हान असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com