Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Angry : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदें संतापले; म्हणाले, 'अरे काही तरी...'

Raj-Uddhav Thackeray Alliance Eknath Shinde Angry : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारले असता ते संतापले.

Roshan More

Eknath Shinde On Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये आमची भांडणे छोटी आहेत. महाराष्ट्रापेक्षा काहीच मोठे नाही असे सांगत उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी देखील शिवसेना कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उत्तर दिले. माझ्याकडून कधी भांडण नव्हतेच. महाराष्ट्रा हितासाठीसोबत येऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार याविषयी दोन्ही पक्षातील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे गावी आहेत. तेथे त्यांना एका मराठी वृत्तवाहिनीच्य पत्रकाराने राज-उद्धव एकत्र येणार आहेत याविषयी विचारले असता ते संतापले आणि म्हणाले 'अरे जाऊदे यार....काय तू कामाचं बोल.' यार...' एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज यांच्या भूमिकेविषयी म्हणाले, असा प्रसारमाध्यमांच्या समोर प्रस्ताव देऊन काही होत नाही खरच इच्छा असेल तर मार्ग असतात. महाराष्ट्राच्या हितासाठी ते पाऊल उचलत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. मात्र ते जर भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे.

...तर मी त्यांच्या घरीही जाणार नाही

उद्धव ठाकरे यांनी भाषणातून राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले की,'महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला मी तयार आहे. मात्र जर कोणी महाराष्ट्राच्या हिताच्या आड येत असेल तर मी त्याला माझ्या घरी बोलवणा नाही. मी त्याच्या घरी जाणार नाही. त्याचे स्वागत करणार नाही त्याच्या पंगतीलाही बसणार नाही.'

एकत्र म्हणजे एकत्र निवडणुका लढणे नाही...

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा असताना मनसेचे मुंबईचे शहाराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ट्विट करत एकत्र येणे म्हणजे एकत्र निवडणुका लढणे नाही. तमिळनाडूत कावेरीच्या मुद्यावर तमिळ पक्ष एकत्र येतात. तर मराठी पक्षांना काय हरकत आहे, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT