Eknath Shinde Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेत ऑपरेश टायगर अॅक्टिव्ह केले. शिंदेंनी घेतल्या बैठकीला ठाकरेंचे आठ खासदार उपस्थित होते, असे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या खासदारांची नावे देखील देण्यात आली आहेत.
'साम टिव्ही'च्या वृत्तानुसार सहा खासदार प्रत्यक्ष तर दोन खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. बैठकीला उपस्थित खासदारांमध्ये अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टेकर, भाऊसाहेब वाकचौरे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राजाभाऊ वाजे, संजय जाधव यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदे घेत संताप व्यक्त केला. सगळे खासदार आपआपल्या कामात आहेत. बैठकीला उपस्थित नसल्याचे त्यांनी म्हटले. आपला मोबाईल चेक कर आपण संपर्क साधला असेल किंवा त्यांनी कोणी संपर्क साधला असेल तर द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच चुकीचे वृत्त देणाऱ्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी दोन टर्म खासदार आहे. दोन्ही वेळा हीच चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याची मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या.
खासदार संजय देशमुख यांनी देखील बैठकीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, मी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हतो. या बैठकीचे मला निमंत्रण होते ना मला कोणी बोलावले होते. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही आणि मी गेलोही नाही.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'मी कोणाला भेटलो नाही. मला कोणी भेटले नाही. मी कुठल्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. मला अशी कुठली बैठक होती हे देखील मला माहिती नव्हते. त्यामुळे मी यावर काय बोलणार?'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.