Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांविरुद्ध 9 बारामतीकर; बारामतीत नशीब आजमावण्यासाठी 13 बाहेरील उमेदवार मैदानात

Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. विशेषतः स्थानिक विरुद्ध बाहेरचे असे समीकरण या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Bypoll News:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) यांच्या विरोधात मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र काल (गुरुवारी) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता २३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

स्थानिक विरुद्ध बाहेरचे

राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री सु्नेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. काँग्रेसच्या उमेदवारानेही आपला अर्ज मागे घेतला.या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मैदानात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे बारामती मतदारसंघाच्या बाहेरील आहेत. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. विशेषतः स्थानिक विरुद्ध बाहेरचे असे समीकरण या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar
Maval News: राजीनाम्यानंतर नवा पेच! मंजुरी अधिकारावरून संभ्रम; वादाचा चेंडू कोर्टात?

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांपैकी केवळ १० उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. तर अन्य उर्वरित १३ उमेदवार उल्हासनगर, सोलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि पुणे अशा राज्याच्या विविध भागांतून बारामतीत नशीब आजमावण्यासाठी आले आहेत.

'बाहेरील' चेहरे

बारामतीबाहेरील उमेदवारांची ही मोठी संख्या सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्यासारख्या तगड्या उमेदवारासमोर हे 'बाहेरील' चेहरे कितपत प्रभाव पाडणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरणे हे मतांचे विभाजन होण्याचे संकेत देत आहे. याचा थेट परिणाम मुख्य लढतीवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांच्या मत आहे.

Sunetra Pawar
Maharashtra News: फडणवीसांचे धडाकेबाज निर्णय: AI वर भर, IT कॅडर; काय बदलणार?

बिचुकले, मुंडे रिंगणात

राज्यातील लोकसभा, विधानसभा अशा अनेक निवडणुका लढवलेले अभिजीत बिचुकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे याही बारामतीत नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

बारामती पोटनिवडणूक उमेदवारांची यादी...

अ.क्र. उमेदवाराचे नाव पत्ता / शहर पक्ष निवडणूक चिन्ह

१ सुनेत्रा अजित पवार, बारामती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. घड्याळ

२ प्रा. आर. वाय घटूगडे सर सांगोला, जि. सोलापूर, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, शिट्टी

३ सतीश कृष्णा कदम जत, जि. सांगली हिंदुस्तान जनता पार्टी हिरा

४ डॉ. अभिजीत बिचुकले सातारा अपक्ष , दूरदर्शन

५ अॅड. अविनाश गायकवाड बारामती अपक्ष साखळी

६ करुणा धनंजय मुंडे बीड अपक्ष एअर कंडिशनर

७ गजानन पाटील येवलेवाडी, पुणे अपक्ष लिफाफा

८ चंद्रकांत रांगाजी मोटे अंबरनाथ अपक्ष कॅमेरा

९ चंद्रकांत वाघमोडे माळेगाव, बारामती अपक्ष प्रेशर कुकर

१० दत्तात्रय बेदरे मंगळवेढा, जि. सोलापूर अपक्ष सीसीटीव्ही कॅमेरा

११ बाळासो मारुती धापटे इंदापूर, जि. पुणे अपक्ष सफरचंद

१२ मिथुन सोपान आटोळे खांडज, ता. बारामती अपक्ष बुद्धिबळपट

१३ मंगलदास तुकाराम निकाळजे बारामती अपक्ष फळांची टोपली

१४ योगेश मोहन उल्हासनगर अपक्ष बासरी

१५ रोहित राजू भोसले निरा वागज, बारामती अपक्ष बॅट

१६ डॉ. विजयकुमार भिसे बारामती अपक्ष रोड रोलर

१७ विराज महादेव शिंदे बारामती अपक्ष गॅस सिलेंडर

१८ शिवाजी कोकरे पणदरे, बारामती अपक्ष ट्रक

१९ सतीश सोनवणे चेंबूर, मुंबई अपक्ष खाट

२० सागर शरद भिसे सातारा अपक्ष ट्रम्पेट

२१ साजन भगवान आडसुळ बारामती अपक्ष किटली

२२ सीताराम विठ्ठल रणदिवे पंढरपूर, जि. सोलापूर अपक्ष बॅटरी टॉर्च

२३ सोनाली राणे कल्याण अपक्ष कपाट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com