Amit Shah, Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Meet Amit Shah : मोठी बातमी! अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले, 'काही खासदार...'

Eknath Shinde Amit Shah BJP Shivsena : एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. मागील आठवड्यात दिल्लीत आल्यानंतर या आठवड्यात देखील ते दिल्लीत आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

Roshan More

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात देखील ते दिल्लीत आले होते. या आठवड्यात देखील ते दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिने त्यांची ही भेट महत्त्वापूर्ण मानली जात आहे.

महाराष्ट्रात अधिकाराच्या वाटणीवरून देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे हे दिल्लीत असल्याने त्यांची नेमकी एकनाथ शिंदेंसोबत काय चर्चा झाली याची उत्सुकता होती. अखरे स्वतः शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना नेमकी काय चर्चाझाली याचे हे सांगितले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, पार्लमेंट सुरू आहे. मागील आठवड्यात देखील मी आलो होतो. पार्लमेंट सुरू असल्याने मी येत असतो. आमचे जे खासदार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत खासदारांच्या लोकसभा क्षेत्रातील ज्या अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली.

शिंदे यांनी खासदारांच्या प्रश्नासाठी गृहमंत्री शहा यांची भेट झाल्याचे सांगितले. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला जागा वाटपात मोठा वाटपा मिळावा. मुंबई महापालिकेतील 50 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेले सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत.

ठाकरे बंधुंचा कसा समाना करणार?

आगामी निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंमध्ये युती होण्याची शक्यता आहे. या युतीची व्याप्ती फक्त मुंबई पुरती असणार नाही. राज्यभर ही युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येत असताना एकनाथ शिंदे यांच्या स्थानाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा सामना कसा करायचा यावर देखील रणनीती दिल्ली भेटीत शिंदे निश्चित करत असल्याची माहिती आहे.

शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांचा 'वाॅच'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंच्या खात्यावर 'वाॅच' आहे. शिंदे यांचे खात्यातील महत्त्वाच्या नियुक्या देखील मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांमध्ये तणाव असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे यावर देखील गृहमंत्र्यांशी चर्चा शिंदे करत असल्याचे बोलले जात आहे.त्यातच बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकाच पदावर दोघांची नियुक्ती केली केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ नसल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT