
रत्नागिरीतील मेळाव्यात भास्कर जाधव भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले, याच वेळी त्यांच्या मुलाने भाषण केलं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात तळकोकणात गळती सुरू असून अनेक पदाधिकारी पक्ष सोडत आहेत.
ही गळती थांबवण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव प्रयत्नशील आहेत.
Ratnagiti News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. नोव्हेंबरनंतर निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षांतराचे वेधच लागले आहेत. तळ कोकणात देखील मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री जेष्ठ नेते रामदास कमद, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्या मतदारसंघाविषयी भाष्य केले होते. यामुळे सध्या गुहागर मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांलेच तापलेले आहे. अशातच एका मेळाव्यात शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव भावनिक झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होताना दिसत आहे. (Political Earthquake in Ratnagiri: Bhaskar Jadhav Reduced to Tears Amid Growing Party Crisis in Shiv Sena UBT)
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. राज्यभर त्यांच्या पक्षात गळती लागली आहे. तळ कोकणातील रत्नागिरीमध्येही पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत आहेत. यामुळे पक्षात गळती लागल्याचे दिसत आहे. ही गळती थांबवण्यासह पक्ष बांधणीकडे भास्कर जाधव यांनी लक्ष घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्याच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले. तर त्यावेळी त्यांचा मुलगा विक्रांत जाधव भाषण करत होतो. यापूर्वी देखील भास्कर जाधव यांना एका मेळाव्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना भास्कर जाधव यांचे डोळे पाणावले, कंठ दाटल्याचं पाहायला मिळाले. विक्रांत जाधव यांनी आपल्या भाषणात, आपल्यासोबत घातच झाला नाही तर विश्वासघात देखील झालाय, असे म्हणताच भास्कर जाधवांचा कंठ दाटला. त्यावेळी त्यांनी आपले डोळे पुसले.
नुकताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जाधव यांनी शिवसेनेचा (उबाठा) वेळणेश्वर येथे मेळावा घेतला. या मेळाव्यात भाषण करताना मुलगा विक्रांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केलेल्या भाषणामुळे भास्कर जाधव भावनिक झाले होते.
दरम्यान भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद नाकारण्यात आले होते. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची मागणी करूनही त्यावर सभागृह अध्यक्षांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. यामुळे भास्कर जाधव नाराज होते. त्यानंतरच जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरत होती.
याच्याआधी भास्कर जाधव आणखी एकदा भावनिक झाले होते. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे मे महिन्यात लग्न होते. त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडली होते. त्यावेळी सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवही भावनिक झाले होते.
प्रश्न 1: भास्कर जाधव मेळाव्यात का भावुक झाले?
उत्तर: मेळाव्यात मुलगा विक्रांत जाधव याने केलेल्या भाषणामुळे भास्कर जाधव भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
प्रश्न 2: शिवसेना (UBT) पक्षात सध्या काय समस्या आहेत?
उत्तर: रत्नागिरीसह राज्यभरात शिवसेना (UBT) मध्ये गळती सुरू आहे. अनेक पदाधिकारी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत.
प्रश्न 3: भास्कर जाधव काय पावले उचलत आहेत?
उत्तर: त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेळावे घेतले आहेत आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.