Eknath Shinde Narendra Modi sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde PM Modi Meeting : निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच एकनाथ शिंदेंनी अचानक मोदींची घेतली भेट, महाराष्ट्रातील तापलेला मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातला

Political News : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात लवकरच येणार असल्याची माहिती या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली.

Sachin Waghmare

Dehli News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी विविध विषयावर या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात येत आहे. उद्यापासून हे पथक सर्वेक्षण करणार असल्याची माहिती या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात बोललो आहे. ते महाराष्ट्राला जमेल तशी मदत करणार आहेत, असे आश्वासन मोदींनी दिले. माझी त्यांच्यासोबत चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची माहिती पीएम मोदी यांनी यावेळी मागवून घेतली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांच्या या भेटीदरम्यान राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे. मात्र, त्यातही या दोन्ही नेत्यांच्या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली आहे. मात्र याबाबत भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले नाही.

दरम्यान, येत्या काळात राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. नेमकी कोणत्या विषयावर ही चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT