Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या हालचालींवर दिल्लीतून एका एजन्सी मार्फत लक्ष ठेवले जात आहे. त्यांचा फोन टॅप होत आहे, असा दावा करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर राऊत यांनी आज नाशिकमध्ये शिवसेना फक्त एकच आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही त्यांची नाही ती भाजपने निर्माण केलेली आहे, असे म्हटले.
'एकनाथ शिंदेंचा पक्ष हा त्यांचा नाही. शिवसेना हे नाव त्याला अमित शाहांनीच दिलं असलं तरी तो अमित शाहांचाच पक्ष आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचा पक्ष चालवत आहेत',असे संजय राऊत म्हणाले.
'मला भविष्यात त्यांचा पक्ष एकसंध राहणे मला अवघड दिसतंय. कारण त्यांच्या पक्षात 20 आमदार हे थेट भाजपचे आहेत, असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेने बद्दल राऊत म्हणाले. अजितदादांच्या राष्ट्रवादीत 17 जण देखील भाजपचेच आहे. तेही विलिन होतील नाहीतर इकडे तिकडे पळून जातील. दोन्ही गटांचे काही खरे वाटत नाहीत,असे देखील राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढले. वाढलेल्या मतदारांच्या आकडेवारी संदर्भात विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतले जात होते. या संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारी संदर्भात माहिती देण्याचे आदेश हायकोर्टाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत संजय राऊत यांनी केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, दिल्लीमध्ये 'आप'ने कामे केली आहेत. त्यामुळे दिल्लीत तेच येतील. कुंभमध्ये पंतप्रधान मोदी स्नान करणार आहेत. त्यावेळी मोदींचे स्नानच दाखवले जाईल टीव्हीवर दिवसभर निवडणुकीचे फार काही दाखवले जाणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप वेगळ्या पद्दतीने लढले. भाजप काहीही करू शकतील कारण कोणतीही गोष्टी सरळ मार्गाने करत नाहीत, असे म्हणत ईव्हीएमवर देखील राऊत यांनी संशय व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.