Vidhan Parishad and Kolhapur Politics : कोल्हापूरच्या सहा मल्लांनी विधानपरिषदेसाठी शड्डू ठोकला; शिवसेनेत मोठी स्पर्धा!

Kolhapur Shivsena and BJP News : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपकडून दोन तर शिंदेंच्या शिवसेनेकडून चौघांची स्पर्धा लागली आहे.
Kolhapur Shivsena
Kolhapur ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur bjp, shivsena and Vidhan Parishad Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्दाखातेर माघार घेणाऱ्या नेत्यांना आता विधानपरिषद निवडणुकीची वेध लागले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी कुठे पाठिंबा तर कुठे माघारीची वेळ आल्याने राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दाची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपकडून दोन तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून(Shivsena) चौघांची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेच्या चारही उमेदवारांना तडजोडी अंती पाठिंबा दिलेल्या नेत्यांनी विधान परिषदेवर जाण्यासाठी निकराची लढाई सुरू केली आहे. वास्तविक पाहता राज्यपाल नियुक्त मध्ये पाच जागा अद्याप नियुक्त होणे बाकी आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. याला अजून काही काळ लागणार असला तरी आतापासूनच हे नंबर लावून आहेत. मात्र एकदा कोल्हापूरला किती आमदार देणार? हे देखील पहावे लागणार आहे.

Kolhapur Shivsena
Thackeray Group: कॉल रेकॉर्डिंगमुळे ठाकरे गटाचं अस्तित्व धोक्यात; पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा डाव सुरू...

विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडून सातत्याने माजी खासदार यांना मुख्य प्रवाहात ठेवण्याचे काम सुरू आहे. सातत्याने घडलेल्या घडामोडीत मंडलिक हे अग्रस्थानी दिसून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर मंडलिक यांना घेण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. तत्पूर्वी राधानगरी विधानसभा मतदार संघात दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिल्याने त्यांनाही आता आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. गोकुळ दूध संघाच्या झालेल्या एका कार्यक्रमा महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील आणि महायुतीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील संकेत दिले होते.

तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मधून भाजपचे(BJP) पोटनिवडणुकीचे उमेदवार सत्यजित कदम यांनी देखील उमेदवारीवर दावा केला होता. मात्र त्या ठिकाणी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. ते देखील आता विधानपरिषदेवर दावा करताना दिसत आहेत. तर शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी पाठिंबा दिला. दोन दिवसांपूर्वी त्यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सूतोवाच केले. शिवसेनेत हे चौघेजण दावेदार आहेत

Kolhapur Shivsena
MLA opportunity : हळवणकर, मंडलिकांच्या रेसमध्ये आप्पांनी सावकार मादनाईकांना ढकलले; विधान परिषदेला आमदारकीची संधी मिळणार का?

तर भाजपकडून उमेदवारी मागे घेतलेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच विधानपरिषदेचा शब्द दिला होता. कोल्हापूर उत्तर मधले भाजपचे नेते महेश जाधव यांनी देखील विधानपरिषदेवर दावा केला आहे. एकंदरीतच पाहता भाजपकडून सुरेश हळवनकर यांना विधान परिषदेवर घेण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडून अथवा महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सावकार मादनाईक यांचे नाव समोर येऊ शकते. कारण हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांची संख्या अधिक आहे. मात्र निवडणुकीनंतरच हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेने नेते नाना कदम यांना नियोजन मंडळाचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभासह विधान परिषदेचे बारा सदस्य आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांची निवडी कोणत्याही क्षणी होऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच सहा मल्लांनी शड्डू ठोकला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com