Eknath Shinde Anandraj Ambedkar  sarkarnama
महाराष्ट्र

Shinde-Ambedkar Alliance : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र! एकनाथ शिंदेंसोबत आंबेडकरांची युती! महायुतीत नव्या पक्षाची एंट्री

Eknath Shinde Anandraj Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असलेले आनंद आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करतात.

Roshan More

थोडक्यात बातमी काय आहे?

एकनाथ शिंदे दलित मतांसाठी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती करणार असल्याची शक्यता आहे.

ही युती ठाकरे बंधू एकत्र आल्यास होणाऱ्या राजकीय फटक्याला उत्तर देण्यासाठी शिंदेंनी आखलेला डाव मानला जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरही सस्पेन्स असून, राज ठाकरे यांनी अद्याप यावर थेट भाष्य केलेले नाही.

Eknath Shinde Politics : आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपली बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे. मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये दलित मतांचा विचार करून शिंदे नवीन पक्षाला सोबत घेण्याच्या तयारीत आहेत.

आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रिपब्लिकन सेनेसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्षांची युती आगामी महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिने महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईतील दलित आणि मराठी मतांसाठी ही युती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असलेले आनंद आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करतात. आंबेडकर घराण्याचा वारसा सांगत त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढती होती. मात्र, तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवीन राजकीय समीकरणामध्ये ते एकनाथ शिंदेंसोबत युती करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्याकडून अधिकृतरित्या काही जाहीर करण्यात आलेले नाही.

ठाकरे बंधूमधील युती धोक्यात?

राज ठाकरे यांनी आगामी महापालिकेच्या दृष्टिने इगतपूरी येथे मनसेचे शिबिर घेतले. या शिबिरात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याबाबत कोणतेही थेट भाष्य केले नाही. पदाधिकाऱ्यांना युतीचा निर्णय माझ्यावर सोपवा योग्य वेळी निर्णय घेईल. शिबिरात काय झाले हे माध्यमांशी बोलू नये, अशी तंबी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये युती होणार की नाही याचा सस्पेंन्स कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT