Gokul Election : गोकुळमध्येही पाटील-महाडिकांना एकत्र करण्याची खेळी; टोकनचा आकडा ऐकून नेते हबकले...

Overview of the Gokul Milk Cooperative Union Election : पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच ठरावांची पळवापळवी सुरू आहे. एका ठरावाचे टोकन लाखांत असल्याने आगामी निवडणुकीच्या काळात त्याच्या गणिताचा अंदाज घेत प्रमुख नेतेच हबकले आहेत.
Kolhapur’s Gokul Milk Union next year’s pivotal election.
Kolhapur’s Gokul Milk Union next year’s pivotal election. sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत वाढीव संचालक करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील एकमेकांच्या शत्रूंना एकत्र करत सत्ता स्थापन केली. सहकारात राजकारण वेगळे हे गणित मांडत जिल्हा बँक राज्यात नावारूपाला आणली. त्याच पद्धतीने गोकुळमध्ये देखील जिल्ह्यातील एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्याची खेळी संचालक वाढीमागची आहे की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच ठरावांची पळवापळवी सुरू आहे. एका ठरावाचे टोकन लाखांत असल्याने आगामी निवडणुकीच्या काळात त्याच्या गणिताचा अंदाज घेत प्रमुख नेतेच हबकले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक देखील बिनविरोध करण्याच्या हालचाली या सभासद वाढीमागे दडल्या आहेत का? अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे.

कोल्हापुरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यात टोकाची ईर्षा आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघ, राजाराम कारखाना, शिवा गोकुळ दूध संघाची निवडणूक असो पैशाचा भरमसाठ वापर हे पूर्ण राज्याने पाहिला आहे. आता गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशाचा अतिवापर याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत चुकीचा पायंडा पडायला नको? त्याचीच खबरदारी जिल्ह्यातील इतर वरिष्ठ नेते घेताना दिसून येत आहेत.

Kolhapur’s Gokul Milk Union next year’s pivotal election.
Donald Trump : गोळी खायलाही तयार होती! ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर आधार देणारी महिला पुन्हा चर्चेत

गोकुळ दूध संधात संचालक मंडळात चार संचालक वाढ़ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या निवडणुकीनंतर सहाच महिन्यांत केडीसीसी बँकेची निवडणूक होत असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळच्या निवडणुकीत सगळ्यांना सोबत घेऊनच जावे लागणार आहे. वास्तविक गोकुळ अध्यक्षच्या निवडीत मुश्रीफ यांनी सर्वात कठीण काळ अनुभवला आहे. पुढील निवडणुकीत सतेज पाटील यांना एकटे पाडण्याची खेळी महायुतीची आहे. मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांची मैत्री पाहता त्यांना दूर ठेवणे हे मुश्रीफ यांच्यासाठी कठीण आहे.

Kolhapur’s Gokul Milk Union next year’s pivotal election.
Gokul Milk News: 'गोकुळ'मध्ये पाटील-मुश्रीफांचा डाव; शौमिका महाडिकांचा विरोध, अध्यक्षांना फोडला घाम

मागील निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरेंसह अनेक मातब्बर नेत्यांना एकत्र घेत महाडिक यांचा पराभव केला. आता राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली आहेत. मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ असल्याने साहजिकच हसन मुश्रीफ यांच्याकडे निवडणुकीतील सूत्रे राहणार आहेत. त्यामुळे वाढीव संचालक करून जास्तीत जास्त बिनविरोध करण्याच्या हालचाली सध्या तरी दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com